*बांधखडक शाळेतील इ.१लीची कु. मैथिली सरकुंडे लक्ष्यवेध प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात द्वितीय*
*राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते गौरव*
जामखेड प्रतिनिधी
*शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक शुभेच्छा संदेशपत्र प्रदान करून मैथिलीचा केला अनोखा गौरव*
जामखेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडक येथील कु.मैथिली नामदेव सरकुंडे या इ.१लीच्या विद्यार्थीनीने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ‘लक्ष्यवेध’ प्रज्ञाशोध परीक्षेत १००पैकी ९८ गुण मिळवत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल रविवार दि.२३ जून २०२४ रोजी सुखकर्ता लाॅन्स अहमदनगर येथे झालेल्या भव्य सत्कार समारंभात राज्याचे माजी शिक्षण संचालक मा.श्री.दिनकर टेमकर ,पाठ्यपुस्तकातील कवी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रतिभावंत ‘रानकवी’ तुकाराम धांडे यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
मैथिली ही सध्या बांधखडक येथे इ. २रीत शिकत असून मागील शैक्षणिक वर्षात तिचा किलबिल गटात हस्ताक्षर स्पर्धेत नायगाव केंद्रात प्रथम क्रमांक आला होता ,तर तालुकास्तरीय समूहगीतगायन व जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत तसेच शिक्षणोत्सव,क्षेत्रभेट,निबंधलेखन ,वार्षिक स्नेहसंमेलन इ.सहशालेय उपक्रमांत तिने सक्रिय सहभाग घेतला होता.
अत्यंत कमी वयात मिळवलेल्या या यशाबद्दल मैथिलीचे जि.प.अहमदनगरचे शिक्षणाधिकारी मा.श्री.भास्कर पाटील , माध्य.उपशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे ,जामखेड पं.स.चे गटविकास अधिकारी मा.श्री.प्रकाश पोळ,गटशिक्षणाधिकारी मा.श्री.कैलास खैरे,खर्डा बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी मा.श्री.संजय नरवडे,नान्नज बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.सुनील जाधव ,जामखेड बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा नायगावचे केंद्रप्रमुख मा.श्री.सुरेश मोहिते ,खर्डा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य मा.श्री.सय्यद मुस्तफा, बांधखडक ग्रा.पं.चे सरपंच मा.श्री.राजेंद्र कुटे,उपसरपंच मा.श्री.तानाजी फुंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.विजय वारे,व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ प्रतिनिधी मंगेश वारे,ग्रामसेविका श्रीम.स्वाती पटेकर आदिंसह बांधखडक येथील सर्व ग्रामस्थ ,पालक व माताभगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
बांधखडक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मैथिलीने प्राप्त केलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल आकर्षक व नाविन्यपूर्ण शुभेच्छा संदेश पत्र प्रदान करून वैशिष्ट्यपूर्णरित्या अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मैथिलीला बांधखडक शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.विकास सौने व आदर्श शिक्षक मा.श्री.मनोहर इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले होते.