78 वा स्वातंत्र्य दिन श्री नागेश विद्यालय संकुलात उत्साहात संपन्न
78 स्वातंत्र्यदिनी वसतीगृह विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 80 हजार किमतीचा शुद्ध पाणी पेयजल आरो प्लांट लोकार्पण सोहळा संपन्न.
जामखेड प्रतिनिधी,
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.ध्वजारोहण संपर्क तज्ञ राहुल शिंगवी यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य राजेंद्रजी कोठारी, हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत ,कन्या विद्यालय स्कूल कमिटी सदस्य प्रा मधुकर राळेभात, सुरेश भोसले ,प्रकाश सदाफुले
प्रा जी सी कुलकर्णी ,प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के ,पर्यवेक्षक संजय हजारे, सौ उल्का कुलकर्णी, डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी,माजी मुख्याध्यापक आर टी साखरे , प्रभाकर सदाफुले, सोले पाटील, शिवाजी ढाळे, दिलीप ढवळे, अशोक यादव, शिकार सर , कुंडल राळेभात, अरुण चिंचकर, हरिदास भोसले, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने साळुंखे बीएस रघुनाथ मोहोळकर प्रा विनोद सासवडकर,प्रा कैलास वायकर एनसीसी ऑफिसर मयूर भोसले आजी माझी रयत सेवक, आज माझी सैनिक, शिक्षक ,पालक नागेश कन्या विद्यालय विद्यार्थी -विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
यावेळी सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे नागेश विद्यालय युनिटने उत्कृष्ट संचलन सादर करून मानवंदना दिली. व एनसीसी विद्यार्थ्यांना रँक प्रदान करण्यात आले.
विद्यार्थी मनोगत व देशभक्तीपर कार्यक्रम यांचे उत्कृष्ट सादरीकरण झाले कै डॉ सी व्ही कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ प्राध्यापक जी सी कुलकर्णी यांनी वस्तीगृह विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पेयजल पाणी 1 लाख 80 हजात रुपये किमतीचे आरोप्लांट दिला त्याचे लोकार्पण सोहळा7 मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुरेश भोसले , विनायक राऊत, शिवाजी ढाळे यांनी मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.प्राध्यापक जी सी कुलकर्णी मनोगता मध्येमी नागेश विद्यालयाचा 1964 चा विद्यार्थी आहे मी रयत चा माझी विद्यार्थी असलेला मला अभिमान आहे.रयत चा विकास चांगला होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संपर्क तज्ञ राहुल शिंगवे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या . विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रामध्ये कार्य करावे. बुद्धिमत्ता कुठे जन्मलो यावर ठरत नाही विद्यार्थ्यांनी भविष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये पुढे जावे व भविष्य उज्वल करावे असे मार्गदर्शन केले.
कुलकर्णी परिवाराच्या वतीने नागेश विद्यालय प्राचार्य मडके बी के व कन्या विद्यालय मुख्याध्यापिका चौधरी के डी ,माजी मुख्याध्यापक आर टी साखरे , प्रभाकर सदाफुले यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य मडके बी के सर यांनी केले तर सूत्रसंचालन एनसीसी ऑफिसर मयूर भोसले व संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका चौधरी यांनी केले.