कोठारी पुन्हा धावले मदतीला,एका बेवारस बेशुद्ध अवस्थेत असलेली व्यक्तीस सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिले जीवदान
जामखेड प्रतिनिधी
जामखेड -नगर रोड वरील पन्हाळकर हॉस्पिटल च्या बाजूला एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे, अशी माहिती राम ओमासे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले सदर व्यक्तीचे वजन जास्त असल्यामुळे आणि उचलून गाडीत टाकण्यास कोणी नसल्यामुळे फार अडचण आली परंतु योगायोगाने विकीभाऊ गायकवाड आणि विशाल फिरोदिया हे आले आणि त्यांनी सहकार्य केले.
तसेच या कामी सनी सदाफुले ,श्याम जाधव
कृष्णा वराडे, यांनी मदत केली काल सुद्धा एसटी स्टँड समोर एक वृद्ध बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्यासही सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीच आपल्या रुग्णवाहिकेत आणले आहे आत्तापर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचवणारे संजय कोठारी हे फोन आला की त्या मिनिटाला आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी जाऊन लोकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.
सदरची घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून पोलीस कॉन्स्टेबल सरोदे हे पुढील तपास करत आहेत.
सदर पेशंट हे जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युवराज खराडे यांनी उपचार चालू केले आहेत.
चौकट
महत्त्वाचे म्हणजे सरकारी दवाखान्यांमध्ये पेशंट उतरवण्यास माणूस नसल्यामुळे महिलां कर्मचाऱ्यांना पेशंट उतरण्यास मदत करावी लागली ही मोठी खंत आहे असे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले.