*राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस जामखेड येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा*
समाजातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना ,शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन – प्रा.कैलास माने
जामखेड प्रतिनिधी
दबंग मुख्यमंत्री व अनाथांचे नाथ म्हणून ज्यांची राज्यात ओळख आहे,असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख प्राध्यापक कैलास माने यांनी केले.
आज दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवसेना तालुकाप्रमुख प्राध्यापक कैलास माने व मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील विद्यमान उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
सकाळी दहा वाजता तालुक्यातील साकत येथील साकेश्वर रामेश्वर गोशाळा येथे गायांना हिरवा चारा देण्यात आले.
तसेच जामखेड शहरातील नगर रोड येथे ,श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित निवासी मूकबधिर विद्यालय येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख प्राध्यापक कैलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसला. नव्या वह्या,खाऊ, दफ्तर मिळाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, शिवसेना दलित आघाडीचे तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र, युवा उद्योजक पै. कपिल माने,सावता जाधव, बाळासाहेब साळवे,आरिफ शेख, रोहित राजगुरू ,श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित निवासी मूकबधिर विद्यालय जामखेड शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पंडित,मुख्याध्यापक गणेश गर्जे सर,दहिफळे सर,गोन्ने सर,अशोक काळे आदी मान्यवर उपस्थित होते.