स्वामी विवेकानंद अभ्यासिका जामखेड मधील यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान..

जामखेड प्रतिनिधी,

स्वामी विवेकानंद अभ्यासिका मध्ये विद्यार्थ्यानी कठोर परिश्रम करून स्पर्धा परिक्षेत यश संपादन केले. यामध्ये अर्चना साखरे, श्रद्धा वीटकर, प्रतिक्षा खाडे, सोनल फरांडे, युवराज घोडेस्वार यांची सहायक महसूल अधिकारी आणि अश्विनी डूचे व वैजीनाथ राऊत यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष व जामखेड नगरपालिका मुख्याधिकारी श्री अजय साळवे साहेब यांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना साळवे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देत असताना जीवनात आलेले आपले अनुभव, स्पर्धा परीक्षा करत असताना करावयाचे अभ्यास नियोजन, तसेच कोणतेही काम मनापासून करण्याचा सल्ला दिला तसेच यशवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे न्यू इंग्लिश स्कूल हतोला या शाळेचे प्राचार्य श्री साळवे डी एन यांनी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये मिळत असलेले शांत व प्रसन्न  वातावरणातील अभ्यासिका वर्तमानपत्रे, मासिके, नोट्स, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि मार्गदर्शन या सुविधा मिळत असलेल्या बाबत समाधान व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद अभ्यासिका ची २०१६ मध्ये स्थापना झाल्यापासून तहसिलदार, पोलीस उपनिरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, सैनिक शिक्षक, क्लार्क पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. दिवसेन दिवस ही संख्या वाढत आहे अशी माहिती संचालक प्रा सोमनाथ शिंदे यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिंदे बी. एस. सर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रा सोमनाथ शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आजिनाथ हळनोर यांनी केले.

यशस्वी विद्यार्थ्याची गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *