*अधिवेशनाच्या पहील्याच दिवशी विधानपरिषदेचे सभापती नामदार मा राम शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात जामखेड तालुक्यात रोहीत पवारांना जोरदार धक्का*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील नाहुली गावात नवीन स्थापन झालेल्या वि का से सोसायटी निवडणुकीत *मार्केट कमिटीचे संचालक मा सचिन घुमरे आणि मा काकासाहेब गर्जे* यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टिचे नऊ उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत.
आ रोहीत पवार आणि जिल्हा बँक संचालक अमोल राळेभात यांनी संपुर्ण ताकद पणाला लावुनही संचालक मा सचिन घुमरे आणि काकासाहेब गर्जे यांनी सभापती मा राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का दिला आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 33 उमेदवारी अर्ज आले होते संचालक अमोल राळेभात यांची सर्व यंत्रणा विरोधी पॅनल मागे उभी असताना देखील विद्यमान मार्केट कमिटी चे संचालक सचिन नाना घुमरे यांनी जोरदार धक्का देत भाजपा चे 9 संचालक बिनविरोध निवडून आणले विरोधी पॅनलचे नऊ अर्ज बाद झाल्याने विरोधकांवर नामुष्की ओढवली.
*विधानसभा निवडणुकीनंतर झालेली ही तालुक्यातील पहीलीच निवडणुक असुन सभापती नामदार प्रा राम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात या निवडणुकीत भारतीय जनता पार्टिच्या कार्यकर्त्यांनी विजयी घौडदौड सुरू केली आहे.*
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे.
नितीन घुमरे, मगन बहिर, बाबुराव बहिर, प्रभाकर बहिर, संदिपान बहिर, दीपक बहिर, अशोक जाधव, राजेंद्र जाधव, बाळासाहेब बहिर.