जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड च्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी
जामखेड प्रतिनिधी –
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे उपक्रम नेहमीच समाज उपयोगी असतात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कोठारी प्रतिष्ठाणच्या कार्यालयात झाली
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेडच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते मा.संजय कोठारी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांनी कोठारी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य खरोखर वाखन्या जोगे आहे गेल्या कित्येक वर्षापासून ते अपघातातील जखमींना वाचवण्याचे काम करत आहेत कधीच जात-पात पाहत नाही अहोरात्र ते २४ तास ही सेवा करत असतात मी स्वतः बऱ्याचदा त्यांचे कार्य डोळ्यांनी पाहिले आहे आत्तापर्यंत त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले असून वृक्षारोपण, देहदान, शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक गणवेश वाटप असे अनेक कार्यात ते स्वतः पुढे असतात त्यामुळे त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे तसेच त्यांनी आजच्या जयंतीच्या उपक्रमाचे कौतुक केले.
तसेच सुरुवातीस प्रार्थना म्हणून कार्यक्रमास सुरुवात केली यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व आदर्श शिक्षक बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, बौद्धाचार्य अशोक आव्हाड, नोटरी पब्लिक ॲडवोकेट सुमतीलाल बलदोटा, महावीर सुराणा, संकेत कोठारी,नगरव्हिजनचे संपादक बौद्धाचार्य पत्रकार संजय वारभोग,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.सुनील जावळे सर,स्नेहालयाचे समन्वयक योगेश अब्दुले,सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक, प्रा.राहुल आहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद नगर येथील युवा कार्यकर्ते दिपक घायतडक, संभाजी आव्हाड,सदाफुले आदी उपस्थित होते.
यावेळी बौद्धाचार्य अशोक आव्हाड म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे प्रत्येकांसाठी महत्त्वाचे आहे. आज १३४ वी जयंती संपूर्ण शहरात साजरी झाली आहे. चार दिवसापासून अनेक ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जयंती साजरी करून सर्वांना प्रेरणा देण्याचे काम केलेले आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी नेहमीच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतात त्यांचे आम्ही सर्व बौद्ध धर्मिय आभार मानतो
यावेळी बोलताना राहुल अहिरे सर म्हणाले, संजय कोठारी हे कधीच जातीपातीचे राजकारण करत नाही समाजकारणात सर्वात पुढे असतात अपघातातील बऱ्याच लोकांना वाचवण्याचे काम त्यांनी केलेले आहे.
यावेळी बोलताना प्राध्यापक सुनील जावळे म्हणाले, आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती साजरी करण्यात आली कोठारी प्रतिष्ठान आणि जैन कॉन्फरन्स गेली पस्तीस वर्षापासून सर्व महापुर्शां च्या जयंती पुण्यतिथी साजरी करत असतात.