*शिक्षणोत्सव ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रयोगशाळा ठरेल-सुनील चव्हाण यांचे गौरवोद्गार*

*शिक्षणोत्सव ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रयोगशाळा ठरेल-सुनील चव्हाण यांचे गौरवोद्गार*

 

*बांधखडक येथे गुणवंतांचा गौरव, आनंदी बाजार,लकी ड्रॉ, राष्ट्रीय कीर्तन, व्याख्यान, निबंध व चित्र प्रदर्शन,नृत्याविष्कार , काव्यवाचन, कथाकथन,विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन इ.विविध कार्यक्रम संपन्न*

 

जामखेड:

जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या ‘मिशन आपुलकी ‘ या उपक्रमांतर्गत आणि पं.स.जामखेड शिक्षण विभागाच्या सहकार्याने जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथे शनिवार दि.२६ एप्रिल ते सोमवार दि.२८एप्रिल २०२५ या कालावधीत तीन दिवसीय शिक्षणोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात रविवार दि.२७ एप्रिल रोजी आयोजित तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाचे माजी सचिव सुनील चव्हाण (भा.प्र.से.) यांनी वरील गौरवोद्गार काढले.

शिक्षणोत्सवात आनंदी बाजार ,बाल आनंद मेळावा,आम्ही सावित्रीच्या लेकी, लकी ड्रॉ , संगीत खुर्ची स्पर्धा, व्याख्यान , गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, राष्ट्रीय कीर्तन, काव्यवाचन,कथाकथन,निबंध व चित्र प्रदर्शन,’किलबिल’ या विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाले.

या तीन दिवसीय शिक्षणोत्सवात मृद व जलसंधारण विभागाचे महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव सुनील चव्हाण (भा.प्र.से.)यांचेसह पुणे येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या काजल भट ,ज्येष्ठ समाजसेवक तथा जैन काॅन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी, सिंदखेडराजा (जि.बुलढाणा) येथील महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.ज्ञानेश्वर झगरे गुरूजी वाकदकर , श्री संत भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विकास म.वायसे शास्त्री, प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शशिकला गुंजाळ (.वांगी ता.भूम जि.धाराशिव) ,कथाकथनकार सुवर्णा तेली (सांगोला जि.सोलापूर), प्रगतशील कृषिकन्या सौ.सोनाली जाधव (नांदूर घाट ता.केज जि.बीड), महसूल सहायक सोनल फरांडे, मुंबई पोलीस राधिका बडे,संत साहित्याचे अभ्यासक तथा साक्षेपी समिक्षक डॉ.ज्ञानेश्वर थोरात (मंचर जि.पुणे), प्रसिद्ध व्याख्याते धर्मराज करपे (गेवराई जि.बीड), शारदा विद्या मंदिर गेवराईचे सेवा निवृत्त प्राचार्य राजेंद्र जगदाळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले.

प्रेरणा व प्रोत्साहन देणा-या या महोत्सवाची सांगता सोमवार दि.२८एप्रिल २०२५ रोजी सुरेश मोहिते ,राम निकम, केशव गायकवाड व नवनाथ बडे या केंद्रप्रमुखांच्या तसेच ग्राम विकास अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील आणि आदर्श शिक्षक मुकुंदराज सातपुते, एकनाथ चव्हाण, हरिदास पावणे,बाळू जरांडे,लहु बोराटे, नवनाथ बहीर, जगन्नाथ राऊत,मोहन खवळे, प्रशांत कुंभार, केशवराज कोल्हे इ.शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाने झाली.विद्यार्थ्यांचा लाजवाब अभिनय व अप्रतिम नृत्याविष्कार पाहून ग्रामस्थांनी बक्षिसांचा वर्षाव केला.यावेळी बांधखडक शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेखांचा समावेश असलेल्या ‘किलबिल’ या हस्तलिखिताचे मान्यवरांचे शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

वरील सर्व कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी शाळेतील आजी माजी विद्यार्थी , शाळा व्यवस्थापन समिती,पालक, शिक्षक , ग्रामस्थ व महिला यांनी विशेष परिश्रम घेतले असून तालुक्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी,त्यांचे पालक,शिक्षक बंधु भगिनी तसेच बांधखडक पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी व कलारसिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सक्रीय सहभाग घेतला.

राज्याला दिशादर्शक ठरलेल्या या शिक्षणोत्सवाचे हे दुसऱे वर्ष असून यशस्वी आयोजन केल्याबद्दल बांधखडकचे सर्व ग्रामस्थ ,महिला,आजी माजी विद्यार्थी तसेच शाळेचे मुख्याध्यापक विकास सौने व शिक्षणोत्सवाचे संकल्पक मनोहर इनामदार यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page