जामखेड नगरपरिषदेसाठी नगरसेवकपदांचे आरक्षण जाहिर
जामखेड प्रतिनिधी;
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जामखेड या “क” वर्ग नगरपरिषदेचीही निवडणूक प्रक्रिया जाहिर झाली असून नगरपरिषद प्रशासन विभागाचे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक डॉ. प्रवीण गेडाम यांनी दि. , १० जुलै २०२५ रोजी हे आदेश जारी केले असून जामखेड नगरपरिषदेसाठी निवडून देण्यात येणाऱ्या नगरसेवकांची एकुण संख्या २४ असणार असून त्यापैकी १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. त्यानुसार जाहिर झालेल्या जागांनुसार ३ (तीन) जागा अनुसूचित जातींसाठी, १ एक जागा अनुसूचित जमातीसाठी, ६ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी व उर्वरित १४ जागा सर्वसाधारण असणार आहेत.
आणि या सर्व २४ जागांसाठीमधूनन विविध प्रवर्ग व सर्वसाधारण अश्या १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. नगरसेवक पदाच्या पडलेल्या आरक्षणानुसर साधारणपणे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रभागरचना होणार असल्याची माहिती जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी दिली आहे.
जामखेड नगरपरिषद कार्यकारिणीचा कार्यकाळ संपुष्टात येऊन जवळपास पाच वर्ष होत आली आहेत. तेंव्हापासून नगरपरिषदवर प्रशासक नियुक्त आहेत. त्यामुळे जामखेड शहराच्या विकासात अनेक अडथळे येऊन जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेची होत असलेली खुप महत्वाची ठरणार आहे.
चौकट जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठी अनुसूचित जमातीकरिता यावेळेस पाहिल्यांदाच एक पद राखीव असल्याने व मागील सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनु. जमातीकरिता राखीव नसल्याने या सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनु. जमाती महिलांकरिता राखीव होईल किंवा कसे. हे सोडतीद्वारे ठरविण्यात येईल. मात्र सोडतीनंतर सदरचे पद महिलांकरिता राखीव झाल्यास सर्वसाधारण महिला जागांची संख्या १ ने कमी होऊन ६ इतकी होईल.