जामखेड शहरातील तपनेश्वर महादेव मंदिरा समोर भव्य त्रीशुलाची उभारणी
विंचरणा नदीकाठाच्या वैभवात पडली भर,भाविकांच्या गर्दीने नदीकाठ गजबजला.
प्रतिनिधी जामखेड
जामखेड शहरातील तपनेश्वर येथील तपनेश्वर महादेव मंदिर विंचरणा नदीच्या काठी येथे भव्य एकतीस फूट उंच त्रिशूल उभे करण्यात आले आहे या त्रिशूलाची शहरातील नगर रोड शांतीनाथ आश्रम येथुन मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिक ठिकाणी सडा रांगोळी काढण्यात आली होती तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती
प्रत्येक ठिकाणी त्रिशूलाची महिला पुजा करत होत्या खर्डा चौक मार्गे तपनेश्वररोड ने महादेव मंदिर पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यानंतर मंदिर जवळ भव्य एकतीस फूट उंच त्रिशूल उभे करण्यात आले आहे
या साठी अक्षय वेल्डिंग चे मालक पंकज जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे यावेळी विधीवत पुजा आरती करण्यात आली आहे मिरवणूकीत सांऊड सिस्टिम साईनाथ जाधव यांनी दिली होती जामखेड शहरातील भजनी मंडळाचे ह भ प पंढरीनाथ राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धनेगाव येथील श्री ज्ञानाई वारकरी संगीत गुरूकुल धनेगाव येथील वारकरी शिक्षण संस्थेचे ह भ प मदन महाराज टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विद्यालयातील विद्यार्थी यांनी पारंपारिक टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूकीत रंग भरला तसेच शहरातील माता भगिनी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
तसेच महिलांनी हात भगवे ध्वज घेतले होते अक्षरशः महिला भगवंताच्या नामस्मरणाने तल्लीन होऊन फूगडी खेळत होत्या ओम नमः शिवाय च्या घोषणांनी जामखेड शहर दुमदुमून गेले शेवटी मंदिरात ह भ प हनुमान महाराज माने महाराज यांचे खाली डोके वर पाय करून प्रवचन झाले हे आगळेवेगळे प्रवचन ऐकून भाविक मंञ मुक्कद झाले होते
हे तपनेश्वर महादेव मंदिर पुरातन असुन रामेश्वर नरूटेश्वर तपनेश्वर व नागेश्वर अशी परिसरात महादेव मंदिरे आहेत ही सर्व मंदीरे पुरातन काळापासून उभे आहेत विंचरणा नदीच्या काठी असलेले हे मंदिर खर्या अर्थाने आ रोहित पवार यांच्या माध्यमातून रस्ता झाला आणि मंदीराचे रूपच बदलले सुरुवातीला या मंदिराची उभारणी पै कदम यांनी छोटे खानी केली आणि त्या नंतर परिसरातील काही नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर मंदीराचे काम हाती घेतले आणि जामखेड शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे आज भाविकांनी एकतीस फूट उंच त्रिशूल उभे केले आहे ते पाहण्यासाठी भाविकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली आहे मंदिर परिसराच्या
शुशोभिकरणासाठी आ रोहित पवार यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे भविष्यात हे मंदिर पर्यटन विकास आराखडय़ात समावेश करण्यात यावा अशी मागणी भाविक करत आहेत.सध्या श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी वाढत आहे याचे कारण म्हणजे हा महादेव नवसाला पावतो अशी धारणा तयार झाली आहे त्यामुळे यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे