जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची आज निवड…
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची निवड उद्या दिनांक 11ऑगस्ट 2025 रोजी दिलीप तिजोरे अभ्यासी अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मा.उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव 12विरुद्ध 0 अशा मतांनी मंजूर झाला होता.त्यामुळे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला होता.हा अविश्वास ठराव पारित झाल्यामुळे जामखेड मार्केट कमिटी ही पूर्णता सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात आली आहे.
उद्या होणाऱ्या उपसभापती पदाच्या निवडीत भाजपाकडून दोन ते तीन नावांची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.परंतु सभापती शिंदे साहेब कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात,यावरच उपसभापती पदाचा उमेदवाराचे नाव शेवटच्या क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांना मानणारे संचालक कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणे सुद्धा औसुक्याचे ठरणार आहे.आज होणाऱ्या मार्केट कमिटीच्या उपसभापती पदाच्या निवडीकडे व या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.