*शासनाच्या हमी भाव योजनेतर्गत सन 2017-2018 मध्ये शेत मालाची वाहतूक केल्यापोटी देय असलेली वाहतूकिची प्रलंबित रक्कम मिळणेबाबत विधानभवन मुंबई येथे बैठक संपन्न*
जामखेड प्रतिनिधी,
शासनाच्या हमी भाव योजनेअंतर्गत सन २०१७-१८ मध्ये शेत मालाची वाहतूक केल्यापोटी देय असलेली वाहतूकीची प्रलंबित रक्कम मिळणेबाबतची महत्त्वपूर्ण बैठक आज विधानभवन, मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीसाठी, महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रीधर बी.डुबे-पाटील, पणन सहसचिव श्री.विजय लहाने, श्री.अनिरुद्ध देशपांडे, श्री.महेंद्र ढेकणे, श्री एस हरी बाबू, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पै शरद कार्ले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.रवींद्र सुरवसे, डॉ झेंडे संचालक राहुल शेठ बेदमुथा यांच्यासह आदी मान्यवर, विधिमंडळ अधिकारी, वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रलंबित रकमेच्या प्रश्नाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाहतूकदारांच्या समस्या, त्यांच्याकडून मांडण्यात आलेली मागणी तसेच योजनेच्या अंमलबजावणीत उद्भवलेले अडथळे याबाबत मनमोकळा संवाद साधण्यात आला.
या चर्चेतून काही ठोस निष्कर्ष काढण्यात आले असून, शेतकरी आणि वाहतूकदार या दोन्ही घटकांचे हित जपले जाईल, याची खात्री बैठकीत देण्यात आली. शासनाच्या वतीने संबंधित रकमेचे त्वरीत व न्याय्य निवारण व्हावे यासाठी आवश्यक ती प्रशासकीय पावले उचलण्यासंदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले
शेतकरी आणि वाहतूकदार हे आपल्या कृषी व्यवस्थेतील दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कष्टामुळेच आपल्या राज्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळते. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांचे सकारात्मक आणि ठोस मार्गाने निराकरण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. असे मनोगत सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केले