जामखेड तालुक्यात राजकीय भूकंप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ वारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटास रामराम
जामखेड प्रतिनिधी
आ. रोहीत पवार हे वन मॅन आर्मी प्रमाणे काम करतात, मी तालुका अध्यक्ष असताना त्यावेळी पक्ष संघटना वाढण्यासाठी आम्हाला कसलेही आधिकर मिळत नव्हते.
त्यामुळे त्यांच्या एकअधिकार शाहीला कंटाळून जामखेड येथील माजी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ वारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
पत्रकार परिषद घेऊन ही माहीती दिली आसुन पुढची भुमिका येत्या पंधरा दिवसांत स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.पत्रकार परिषदेत बोलताना दत्तात्रय वारे यांनी सांगितले की गेल्या पस्तीस वर्षांपासुन मी राजकारणात सक्रिय आहे.

वीस वर्षे भारतीय जनता पार्टीचे व पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. भारतीय जनता पार्टीत असताना तालुका युवा मोर्चाच्या अध्यक्षा पासुन ते जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षा पर्यंत काम केले आहे.
तसेच पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य असेही राजकीय पदे भुषवली आहेत. पस्तीस वर्षे काम करीत असताना लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील नेत्यांना निवडुन देण्यात माझा मोलाचा वाटा आहे. आ. रोहित पवार यांच्या 2019 व 2024 च्या निवडणुकीत निवडुन देण्यात देखील प्रामाणिक पणे काम केले आहे मात्र सध्या जड अंतःकरणाने मी पक्षाचा राजीनामा दिला आहे.आ.रोहित पवार यांचे काम वन मॅन आर्मी प्रमाणे सुरू आहे. तालुक्याच्या कार्यकर्त्यांचे कनेक्शन शहरातील कार्यकर्त्यांशी आसते मात्र आ.रोहित पवार यांचे पी.ए. हेच जाऊन शासकीय कार्यालयात जाऊन भेटतात त्यामुळे कार्यकर्त्यांची व जनतेशी असलेली नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे संघटनात्मक काम करण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळत नाही. आता मी पक्षातून मोकळा झालो आहे.
पुढे ज्या पक्षात जाईल त्या ठिकाणी प्रामाणिक पणे काम करणार आसुन सध्या कुठलीही निवडणुक लढणार नाही असे देखील वारे यांनी सांगितले. ज्यापक्षात जाईल त्या पक्षात संघटनात्मक काम करणार आहे. मात्र ज्या व्यासपीठावर मला योग्य सन्मान मिळेल त्याच पक्षात मी प्रवेश करणार आहे. या पत्रकार परिषदे दरम्यान दत्तात्रय वारे यांच्या समवेत रत्नापूर येथील आजी माजी सरपंच, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()