‘पी एम धन धान्य’ कृषी योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) सकाळी 11 वाजता दिल्लीत योजनेचा प्रारंभ होणार व पीएम दलहन आत्मनिर्भरता मोहिमेचा आज प्रारंभ

‘पी एम धन धान्य’ कृषी योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) सकाळी  11 वाजता दिल्लीत योजनेचा प्रारंभ होणार व पीएम दलहन आत्मनिर्भरता मोहिमेचा आज प्रारंभ

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत या योजनेचे लाइव्ह प्रक्षेपण व भाषण ऐकण्यासाठी आपल्याला स्क्रीन ची व्यवस्था जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती व खर्डा चौक बीड कॉर्नर येथे व्यवस्था केली आहे तरी याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा हि विंनती सरकार कडून करण्यात आली आहे

dhan dhanya Krishi yojana
‘धन धान्य’ योजनेसाठी राज्यातील नऊ जिल्ह्यांची निवड,अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेल्या पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची अंमलबजावणी आजपासून (शनिवार) देशातील शंभर जिल्ह्यांत सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या एकत्रिकरणातून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) दिल्लीत योजनेचा प्रारंभ होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान धन धान्य कृषी योजना सुरू करण्यात येत आहे. देशभरात कृषी उत्पादन मागास असलेल्या शंभर जिल्ह्यांत या योजनेची अंमलबजावणी होणार असून, प्रामुख्याने कमी उत्पादकता असलेले, कमी सिंचन क्षमता असलेले, कृषी कर्जाची उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या जिल्ह्यांची निवड झाली आहे.

शेतीत सुधारणा, उत्पादन वाढ, पीक विविधीकरण आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा योजनेचा उद्देश असून, पुढील सहा वर्षे योजना राबवली जाणार आहे. योजनेवर दरवर्षी २४,००० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. महाराष्ट्रातील निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये धान्य साठवण, प्रक्रिया, सिंचन सुधारणा, तसेच स्थानिक पातळीवरील रोजगार निर्मिती यावर भर दिला जाणार आहे.

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचा प्रारंभ उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत पुसा इथं होणार आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दलहन आत्मनिर्भरता मोहिमेचं उद्घाटनही करतील. याच कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी ४२ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या विविध योजनांचा ही प्रारंभ ते करणार आहेत. तसंच पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रांतल्या ११ शे हून अधिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे. राज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६हून अधिक योजना राबवून पिकांची उत्पादकता वाढवणं, पीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणं, तसंच काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील आणि प्रगतिशील कामगिरी करणारे ३०० हून अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page