जामखेड शहरातील समस्या सोडवण्यासाठी सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांची समिती गठीत
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड शहराच्या विकासासाठी व अडचणी संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून आणी निवेदने देउन पण समस्या जैसे थे च आहेत म्हणून त्रस्त नागरिकांनी एकत्र येत अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाविरोधात आवाज उठवण्यासाठी आशा भेळ बीड रोड जामखेड येथे दिनांक १०/१०/२०२५ रोजी मीटिंग आयोजित केली होती

या मध्ये उपस्थित नागरिका पैकी सुनिल जगताप यांनी या अडचणी सोडवण्यासाठी कृती समिति असावी असा ठराव मांडला याला सर्वानुमते मान्यता दिली अध्यक्ष म्हणून बाबासाहेब चंदन यांची उपाध्यक्ष पदी सतिश राजगुरु यांची आणि प्रफुल्ल सोळंकी यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली..यावेळी सल्लागार म्हणून सुनील जगताप ,अॅड .महारुद्र नागरगोजे व अॅड.ऋषीकेश डुचे यांची निवड करण्यात आली.
तसेच उपस्थित नागरिक सदस्य म्हणून कार्यकारणीत समाविष्ट करण्यात आले..
यामधे अशोक मामा पितळे महेंद्र कदम सर विजय राळेभात बालाजी आजबे रमेश कोल्हे आकाश बाफना बालाजी राळेभात प्रशांत शिंदे अनिल जगदाळे आनंद बाफना, मनोज राउत गणेश आजबे भास्कर डहाळे ,नितीन मुनोत अमोल पेचे महेश यादव महेश भोगल प्रमोद गांधी प्रतीक राळेभात ,आप्पासाहेब सोंडगे ,बाळासाहेब मुळे ,तुषार बोरा ,तुषार बोथरा आदी उपस्थित होते.

समीती गठीत होताच मुख्य रस्ता वरील धुळ , शहरातील स्वच्छता, पार्कीग साठी जागा मोकाट जनावरे यांसंदर्भात मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद यांना निवेदन दिले तसेच मेन बाजार पेठतील गर्दी लक्षात घेता वाहतुक संदर्भात पोलीस निरिक्षक साहेब व तहसीलदार यांना व वरिल कामे दिवाळी पुर्वी करावेत अशी विनंती केली.


तसेच जामखेड मधील मध्यवर्ती रस्ता बीड रोड गेल्या दोन ते तीन वर्षापासून काम चालू आहे परंतु अद्याप काम पूर्ण झाले नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उधळत आहे जामखेड मधील नागरिक व व्यापाऱ्यांना याचा खूप त्रास होत आहे परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.. यासारख्या अशा अनेक समस्या जामखेड मध्ये आहेत परंतु नगरपालिका व संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहेत यासाठी जामखेड मधील सामान्य नागरिक व व्यापारी यांनी एकत्र येत जामखेड बचाव कृती समिती स्थापन केली आहे याचा मुख्य उद्देश स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड करण्याचा उद्देश आहे… यामध्ये निस्वार्थीपणे शहरासाठी काम करणाऱ्या सामान्य नागरिकांचा यामध्ये सहभाग आहे
![]()