खर्ड्याचे मा.सरपंच संजय गोपाळघरे यांच्यावर प्राणघातक हल्ला,आरोपीस खर्डा पोलीसांनी केले तात्काळ अटक. घटनेच्या निषेधार्थ आज खर्डा शहरात मूक मोर्चा..

खर्ड्याचे मा.सरपंच संजय गोपाळघरे यांच्यावर प्राणघातक हल्ला,आरोपीस खर्डा पोलीसांनी केले तात्काळ अटक. घटनेच्या निषेधार्थ आज खर्डा शहरात मूक मोर्चा..

 

जामखेड प्रतिनिधी,

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,दिनांक 23/10/2025 रोजी सायंकाळी 6/15 वा च्या सुमारास फिर्यीदी खर्डा गावचे मा.सरपंच संजय शिवाजी गोपाळघरे हे मोटारसायकलवरुन सितारामगड खर्डा या ठिकाणी जात असताना त्यांच्या परिचयाचा असलेला इसम संतोष उर्फ पोपट सुरवसे रा.वडारवाडा ता.जामखेड याने त्यांना हात देवुन मला समोर सोडा असे सांगुन मोटरसायकल गाडीवरती मागे बसल्यानंतर त्याने अचानक फिर्यादी यांच्या चालु गाडीवरती पती मागून धारधार वस्तुने गळ्यावरती वार केला व त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांना तात्काळ खर्डा येथील हॉस्पिटलमध्ये आणले असता त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते या घटनेतून बचावले.

या घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी ऐतिहासिक खर्डा किल्ला ते श्री क्षेत्र सिताराम गड या ठिकाणावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे.संजय गोपाळघरे यांचे फिर्यादी वरुन खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नं- 166/2025 भारतीय न्याय संहिता 109(1),352) प्रमाणे फिर्याद दिली आहे.सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत यांनी तात्काळ पथक तयार करून सदर घटना स्थळी जावुन भेट दिली व आरोपीस तत्काळ शोधून सदर गंभीर गुन्हा करणारा आरोपी नामे संतोष उर्फ पोपट जगन्नाथ सुरवसे यास अटक केली असुन त्याला मा.प्रथम वर्ग न्यायालय कर्जत या ठिकाणी हजर केले असता न्यायालयाने त्यास 4 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.

 

याबाबत आरोपीने मोटरसायकल थांबविली व मागे बसून अचानक हल्ला कशामुळे केला याचाही शोध पोलीस घेत असल्याचे समजते आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अपर पोलीस अधीक्षक,वैभव कलुबर्गे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे साहेब यांच्या मार्गदशनाखाली खर्डा पोस्टे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत साहेब पोलीस अंमलदार,संभाजी शेंडे,वैजिनाथ मिसाळ,अशोक बडे,गणेश बडे,योगेश भोगाडे यांनी सदरची कारवाई केली आहे.व पुढील तपास खर्डा पोस्टेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत हे करत आहेत.या अचानक झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page