पक्षाने उमेदवारी दिली तर करणार अन्यथा पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच काम करणार – प्रा मधुकर राळेभात
जामखेड प्रतिनिधी,
नगरपरिषदेचे बिगुल वाजले निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच भावी नगरसेवक भावी नगराध्यक्षा पोस्टर सोशल मीडियावर वाढले
आज जेष्ठ नेते मधुकर आबा राळेभात यांची पत्रकार परिषद निवडणुकीच्या पार्शवभूमीवर संपन्न झाली यावेळी पत्रकार बांधवांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी बोलताना आबा म्हणाले कि,जामखेड शहर स्वछ सुंदर करण्यासाठी ,जामखेडचा विकास करण्यासाठी सत्तेची गरज आहे सत्तेतील माणसाच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे.जामखेड शहरात गुंडागर्दी वाढली आहे ती थांबवली पाहिजे जामखेडला कुठलीही midc किंवा इंडस्ट्री नाही त्यामुळे तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे
यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मोठमोठे कॉम्प्लेक्स झाले पाहिजेत त्यामध्ये मॉल ,सांस्कृतिक भवन झालं पाहिजे आणि जामखेड बदनाम झालंय असं अजिबात नाही कशानाही शहर बदनाम होत नाही व्यापार पेठ जामखेडची मोठी आहे त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून सुंदर शहर व स्वछ शहर झालं पाहिजे आणि जामखेड कर म्हणून प्रत्येक नागरिकांनी माझं जामखेडकर म्हणून पाहिलं पाहिजे
जामखेडसाठी आता काय तरी करायची वेळ आली आहे आम्ही जेष्ठ नेते म्हणून काम करत आहोत परंतु विकास जामखेडचा झाला नाही आता मात्र जामखेड हरित करायचं असेल तर पर्याय नाही पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देईल ती मी स्वीकारणार आहे.
माझीही पत्नी बीपीएड आहे सुशिक्षित आहे मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे पक्षाने दिली संधी तर त्याच सोन करिन,सभापती प्रा राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणतील तत्यामुळे विकास आता दूर नाही आपण सर्व जण मिळून जामखेड शहर स्वछ सुंदर हरित करू,असे अवाहन केलंय
यावेळी नगरसेवक दिगंबर चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते प्रा.लक्ष्मणराव ढेपे,पवन राळेभात,अमित जाधव, भाजपा व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष निलेश उर्फ पिंटूशेठ बोरा,गणेश राळेभात, उद्धवराव हुलगुंडे,अशोक गायकवाड,राजू वारे,ॲड अमृत राळेभात,विलास मोरे, वैभव काटकर,सुरज राळेभात,लखन राळेभात आदी मान्यवर उपस्थित होते.

![]()