नान्नज बंदला गावकऱ्यांचा,व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, गाव बंद ठेऊन समस्या सुटत नसेल तर रस्तारोको आंदोलनांचा ग्रामस्थांचा इशारा

नान्नज बंदला गावकऱ्यांचा,व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, गाव बंद ठेऊन समस्या सुटत नसेल तर रस्तारोको आंदोलनांचा ग्रामस्थांचा इशारा

जामखेड तालुका प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे शहाजी राजेभोसले यांचे बसस्थानक सह विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणला पाठिंबा म्हणून गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी गाव कडकडीत बंद ठेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे नान्नज बंदला व्यापाऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला गावकऱ्यांची एकता हीच आपली ताकद आहे असे दाखवून दिले

नान्नज गावाची अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना एकत्र येण्याची वेळ आली आहे बसस्थानक, बँक, रस्ते, पाणी, या मागण्या कोणत्याही एका पक्षाच्या किंवा व्यक्तिगत कोणाच्या फायदेसाठी नाही या मागण्या आपल्या नान्नज शहर व परिसरातील सर्व महिलां, व आपल्या मुली, विद्यार्थीनी यांच्या सह सर्व नागरिक यांच्या भविष्यासाठी आहे यामुळे शहाजीराजे भोसले उपोषणास बसले आहेत त्या मुळे नान्नज ग्रामस्थ सह आजुबाजुच्या गावातील गावकऱ्यांनी उपोषणला जाहीर पाठिंबा दिला आहे

नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यांमुळे संपूर्ण परिसराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे नान्नज येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, तसेच शेतकरी, लहान व्यापारी, वृद्ध व तरुणांच्या सोयीसाठी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ किंवा ‘बँक ऑफ महाराष्ट्र’सारख्या राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्ते राजेभोसले यांची आहे

नान्नज शहरात अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, औषधाची दुकाने, दुध हे सर्व चालू होते व अत्यावश्यक सेवा नेहमी प्रमाणे सुरू राहणार नान्नज गाव व्यापाऱ्यांनी शंभर टक्के पुर्ण पणे आपली दुकाने बंद ठेवून उपोषण ठिकाणी बसुन जाहीर पाठींबा दिला नान्नज गावात अत्यंत शांततेत व संयमाने व लोकशाही मार्गाने गाव बंद पाळण्यात आला

उपोषणकर्ते शहाजी राजेभोसले यांनी मांडलेल्या मागण्या जनहिताच्या आहे प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीचा व जनभावनेचा विचार करून या मागण्याची गांभीर्याने दखल घ्यावी व त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा ही नान्नज गावातील सर्व नागरिकांच्या बोलण्यातुन येत आहे या वेळी नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बनसोडे यांनी उपोषणकर्ते भोसले यांची तपासणी केली

प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा आज नान्नज गाव कडकडीत बंद ठेवण्यात आला होता गाव बंद ठेऊन ही तोडगा निघत नसेल तर नंतर जामखेड – करमाळा रोडवर रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी सह नागरिकांनी दिला आहे नान्नज बंदच्या पाश्र्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, पोलीस कॉ. काळाणे, पोलीस कॉ. जाधव यांनी नान्नज गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नान्नज गावात कसलाही अनुचित प्रकार घडला नाही शांततेत गाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles