नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार… कै. विष्णू उस्ताद बाबा काशीद प्रतिष्ठान च्या वतीने सलग 24 व्या वर्षी मैदानाचे आयोजन.

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार… कै. विष्णू उस्ताद बाबा काशीद प्रतिष्ठान च्या वतीने सलग 24 व्या वर्षी मैदानाचे आयोजन.

 

जामखेड प्रतिनिधी

जामखेड ची पंचमी चा तसा राज्यात खूप नाव लौकिक अनेक हौसे नवसे या यात्रेला अगदी आवर्जून हजेरी लावतात परंतु अलीकडच्या काही दिवसात ही यात्रा चर्चेत आली ती कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठान यांच्या वतीने मराठा गौरव युवराजभाऊ काशीद व उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍडव्होकेट अजय काशीद यांच्या नियोजनाने आयोजित केलेल्या या भव्य दिव्या निकाली कुस्त्याच्या मैदानाने.आणि त्याच कारण ही तसच आहें कारण हे एकमेव मैदान असे आहें जिथं वेगवेगळ्या राज्यातून पैलवान कुस्ती करण्यासाठी येतात त्याच बरोबर विविध राज्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची या मैदानाला आवर्जून उपस्थिती असते.


नागपंचमी यात्रेनिमित सालाबादप्रमाणे या वर्षीही कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठान च्या वतीने ऍड. अजय काशीद मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता जामखेड येथील जामखेड महाविद्यालय जामखेड येथे महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद चे सभापती नामदार प्राध्यापक राम जी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आले आहें.दुपारी 12 वाजता जामखेड येथील शनी मंदिरातून मिरवणूकीला प्रारंभ होईल या मिरवणूकीच प्रमुख आकर्षण म्हणजे मराठा गौरव युवराज भाऊ काशीद मराठी भाषिय संघ अध्यक्ष मध्यप्रदेश यांची उपस्थिती लाभणार आहे.


या मैदानाची पहिली मानाची कुस्ती पै. रविराज चव्हाणआंतरराष्ट्रीय आखाडा पुणे विरुद्ध महारुद्र का ळेज कुर्डुवाडी यांची होणार आहें तसेच दुसरी कुस्ती पै. मोईन पटेल कुर्डुवाडी विरुद्ध मुसा पहलवान महापौर केसरी इंदोर यांच्यात होणार आहें. तिसरी कुस्ती रोहित दैया शाहू कुस्ती केंद्र विरुद्ध पै. शाहरुख खान पुणे यांच्यात होणार आहे, चौथी कुस्ती सौरभ गाडे पाटोदा विरुद्ध तात्या घुले कोल्हापूर तर पाचवी कुस्ती पृथ्वीराज वनवे शंभूराजे कुस्ती संकुल जामखेड विरुद्ध अमोल दिंडे चाऊस आष्टी यांच्यात होणार आहे.यावर्षी कुस्त्यांचे नियोजन करत असताना नेमून दिलेल्याच कुस्त्या होतील त्याव्यतिरिक्त एकही कुस्ती ऐनवेळी लावली जाणार नाही.

राज्यातील पैलवान सोबतच बाहेरील राज्यातील पैलवानांची उपस्थिती या मैदानाच एक आगळ वेगळं वैशिष्ट्य आहे. यापूर्वी अनेक नामांकित पैलवानाची या मैदानाला हजेरी लागलेली आहे.जामखेड सारख्या ग्रामीण भागात या सर्व कुस्तीपटु साठी इतक्या मोठ्या प्रमाणात अजय काशीद यांच्या वतीने हे मैदान दरवर्षी उपलब्ध करून दिले जाते अनेक तरुण आज व्यसनाधीन वेगवेगळ्या वाम मार्गाला जात असताना त्यांच्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अजय काशीद यांच्या वतीने होतं आहे त्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी राबवले जातात, त्यामुळे राजकारण करत असताना अश्या विविध सामाजिक उपक्रमामुळं अजय काशीद यांची एक वेगळी ओळख निर्माण होतं आहे.

दरवर्षी अनेक पैलवान तसेच अनेक कुस्तीपट्टू या मैदानाला मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात यावर्षी सालाबादप्रमाणे सर्व कुस्ती शौकीनानी हजेरी लावावी अशी विनंती अजय काशीद, काशीद परिवार तसेच अजय काशीद मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles