पै. रविराज चव्हाण ने महारुद्र वर गिस्सा डाव टाकत जिंकली मानाची पहिली कुस्ती…
जामखेड प्रतिनिधी,
नागपंचमी यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे 24 व्या वर्षी कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठान च्या वतीने भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे मैदान अजय दादा काशीद मित्र परिवाराच्या आयोजित करण्यात आले होते.
कुस्ती आखाद्यातून थोपटले राम शिंदे यांनी राजकीय दंड……..मागच्या वर्षी अर्धवट राहिलेली कुस्ती पुढच्या वर्षी पुन्हा त्यांना बोलावून एकदा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या आणि मग कोण कुणाला पाणी पाजतो हे जामखेड च्या जनतेला कळू द्या असा राजकीय टोला कुस्तीच्या आखाद्यातून राम शिंदे यांनी लगावला
नागपंचमी यात्रेनिमित्त सलग 24 व्या वर्षी कै. विष्णू उस्ताद काशीद बाबा प्रतिष्ठान च्या वतीने भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे मैदान जामखेड महाविद्यालय जामखेड या ठिकाणी भरवण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे बोलत होते.
यावेळी पहिली मानाची कुस्ती रविराज चव्हाण आंतरराष्ट्रीय आखाडा पुणे आणि महारुद्र कळेज कुर्डवाडी यांच्यात अतिशय रोमहर्षक अशी झाली डोळ्यांचे पारणें फिटावे अशी ही कुस्ती झाली गिस्सा डावाने मात करत रविराज हा मानकरी ठरला ही कुस्ती पाहून सर्व कुस्तीशौकीनसमाधान व्यक्त करत होते.दुसरी कुस्ती पै. मोईन पटेल विरुद्ध मुसा पहेलवान यांच्यात झाली यामध्ये मुसा पहेलवान विजयी झाला, तिसरी कुस्ती रोहित दैय्या विरुद्ध शाहरुख खान यांच्यात झाली यामध्ये शाहरुख खान विजयी ठरला. या सोबतच अनेक रोमहर्षक लढतीन जामखेड करांचे लक्ष वेधून घेतले.
या आखाड्यामध्ये या वर्षीही इतर राज्यातील अनेक मल्लानी उपास्थिती लावली आणि अनेक दैदीप्यमान कुस्त्यांचं प्रदर्शन केल. सर्व कुस्त्या या आधीच ठरवून लावण्यात आल्या असल्यामुळे एका पेक्षा एक अश्या कुस्त्या जामखेड करणा यावर्षी पाहायला मिळाल्या.
या मैदानात अनेक राजकीय नेते मंडळी त्यांचसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आलेल्या प्रत्येक मान्यवरांनचा सत्कार करण्यासाठी स्वतंत्र स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी अजय दादा काशीद मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून दरवर्षी एक वेगळा उपक्रम राबवला जातो यामध्ये चालू वर्षी गोळाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्या बद्दल साळुंके सर यांचा सत्कार करण्यात आला.

या आखाद्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे मैदान सुरु होण्यापूर्वी निघालेली मिरवणूक आणि या मिरवणुकीत उपस्थिती लाभलेले मराठा गौरव युवराज भाऊ काशीद.
नागपंचमी यात्रा राज्यात वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध होती परंतु या भव्य दिव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानाने राज्यभर वेगळा नावालौकिक अजय दादा काशीद यांच्या माध्यमातून पाहवयस मिळत आहे त्यामुळं परिसरात आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे
![]()
