*कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवा व जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आमदार रोहित पवार यांचा लढा*
कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आमदार रोहितदादा पवार यांचे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन!
कर्जत जामखेड ची जनता व युवांवर होणारा अन्याय थांबून तात्काळ एमआयडीसीला मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून शासन दरबारी आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा सुरू होता याबाबत वेळोवेळी त्यांनी उद्योग मंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना याबाबत निवेदनही दिले होते.
परंतु, शासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर आपण मंजुरी न मिळाल्यास आंदोलन करू असा इशारा सरकारला दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीचा मुद्दा मार्गी लावू असे आश्वासन दिले त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते.
परंतु पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप यावर कोणत्याही चर्चा करण्यात आलेली नाही त्यामुळे आता अखेर आमदार रोहित पवार हे स्वतः विधान भवन परिसरात आज सकाळपासूनच आंदोलनाला बसले आहेत.