जिल्हा सहकारी बँक जामखेड शाखेचे वसुली अधिकारी नवगिरे साहेब यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
*नवगिरे साहेब यांनी बँकेच्या वसुली विभागाला दिलेले योगदान, त्यांची प्रामाणिकता नेहमीच स्मरणात राहील. कठीण परिस्थितीतही त्यांनी बँकेचे हित जपले-मा सभापती सुधीर राळेभात*
जामखेड प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे वसुली अधिकारी नवगिरे साहेब यांचा सेवापूर्ती सोहळा माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुधीर दादा राळेभात यांच्या उपस्थित आशा व्हेज ट्रिट हॉल मधे संपन्न झाला यावेळी नवगिरे साहेब यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी सभापती सुधीर राळेभात म्हणाले आपल्या बँकेचे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले वसुली अधिकारी श्री. नवगिरे साहेब आज आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर* *सेवानिवृत्त होत आहेत*.*त्यांनी बँकेच्या वसुली विभागाला दिलेले योगदान, त्यांची प्रामाणिकता नेहमीच स्मरणात राहील. कठीण परिस्थितीतही त्यांनी बँकेचे हित जपले*.*बँकेसाठी दिलेली 35+ वर्षांची सेवा… आज तुमच्या सेवानिवृत्तीचा दिवस! तुमच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांनी कुठल्याही शेतकऱ्याला त्रास दिला नाही प्रेमाने वसुली केली समजून सांगितलं एडजस्ट मेंट करून शेतकऱ्यांचं हित जपत बँकेचे पण हित पाहील आज आम्हाला अस वाटतय त्यांची सेवा संपली तरी जेव्हा बँकेला त्यांच्या अनुभवाची गरज लागेल तेव्हा ते आमच्या मदतीला येतील अशी आशा व्यक्त करतो व यांच्या पुढील आयुष्य निरोगी, आनंदी आणि समृद्ध जाओ हीच शुभेच्छा देतो
तसेच यावेळी नवगिरे साहेब यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की स्व सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात हे आमचे मार्गदर्शक नसून त्यांनी आमच्यावर वडिलांसारखे प्रेम करत प्रेमाने आम्हाला झापल पण आहे त्यांची शेतकऱ्यांशी असलेले प्रेम काळजी शेतकऱ्यांसाठी काहीही करण्याची तयारी ही आम्हाला वेळोवेळी प्रेरणा देत राहिली ,हार्ड वसुली करू नका म्हणायचे शेतकऱ्यांना व्यवस्थित बोला समजून सांगा म्हणायचे थोडे थोडे कर्ज जमा करत असतील तरी जमा करून घ्या लवकर कर्ज वाटप करा शेतकऱ्यां प्रती असलेली तात्यांची तळमळ आम्हाला समजायची महनून माझ्या हातून चांगल काम झाल अजून देखील बँकेसाठी कधीही मदतीला येईल व माझा सत्कार केला तुमचे सर्वांचे आभार मानतो
या कार्यक्रमासाठी माजी सभापती सुधीर दादा राळेभात,दहीकर साहेब,चेअरमन महादेव डिसले,डेप्युटी मॅनेजर शिरगिरे साहेब,व बँकेचे सर्व सेवक व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सपकाळ यांनी केले व आभार मनोज शेळके यांनी मानले
![]()


