प्रशासनाची अतिक्रमण मोहीम थंडावली,व्यापाऱ्यांनी स्वतः दहा फूट अतिक्रमण केले जमीनदोस्त

प्रशासनाची अतिक्रमण मोहीम थंडावली,व्यापाऱ्यांनी स्वतः  दहा फूट अतिक्रमण केले जमीनदोस्त
जामखेड –

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगतचे अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रशासनाची थंडावली असली तरी आता विश्वक्रांती चौक ते बीड कॉर्नर पर्यंत असलेले नव्वद टक्के व्यापारी स्वताहाहून पोकलॅन, जेसीबी, टॅक्ट्रर लावून आपापले अतिक्रमण काढून घेत आहेत. त्यामुळे बीड रस्ता धुळीने माखला असून रस्त्याचा श्वास मोकळा झाला आहे. व्यापा-यांच्या भुमिकेवर नागरिकांनी समाधान व्यक्त करून ‘देर आये दुरुस्त हुआ’ अशी चर्चा करत आहेत.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगतचे अतिक्रमण काढण्याची प्रशासनाची संयुक्त मोहीम ६ आँक्टोबर पासून सुरू झाली. नगरपरिषदेने दिलेल्या नोटिसीप्रमाणे गटारीपासून दहा फूट अंतरातील सर्व अतिक्रमण काढण्यात यावे अशा नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने शासकीय दुध कार्यालयापासून ते विश्वक्रांती चौकापर्यंत धडाक्यात कारवाई झाली पण तेथून पुढे ती राष्ट्रीय महामार्गाच्या गटारी पासूनच्या अंतरावरून वादात सापडली होती. यावेळी प्रशासन व व्यापारी वाद झाला. तसेच याबाबत व्यापारी व नगरसेवक यांच्यात बैठक होऊन दहा फूट अतिक्रमण काढून घेण्याचे सुचवण्यात आले. त्यानुसार बीड कॉर्नर ते विश्वक्रांती चौक पर्यंत रस्त्याच्या एका बाजुला व्यापा-यांनी स्वताहा होऊन अतिक्रमण काढण्यासाठी पोकलॅन, जेसीबी व टॅक्ट्रर लावून काढून घेत आहेत त्यामुळे सदर रस्ता धुळीने माखला आहे.
नगरपरिषदेने व्यापा-यांना गटारी पासून दहा फूट अतिक्रमण काढावे या नोटीसीप्रमाणे व्यापारी अतिक्रमण काढत असल्याने सदर रस्त्याचा श्वास मोकळा झाला आहे. प्रशासनाची सध्याची अतिक्रमण मोहीम थंडावली असली तरी २१ आँक्टोबर पर्यंतच्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून आहे. व्यापारी स्वताहाच अतिक्रमण काढत असल्याने प्रशासनाचा खर्च वाचला आहे व प्रशासनाला सहकार्याची भुमिका घेत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles