जामखेडमध्ये पोलिसांची वाहन चालकांवर ॲक्शन सुरू,वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड शहरात संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिसांनी खर्डा चौक परिसरात वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना पोलिसांनी वाहनचालकांवर केलेल्या कारवाईचे स्वागत करायचे की या कारवाईच्या सातत्याबाबत प्रश्न उपस्थित करायचे, असा मुद्दा नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
विशेषतः हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब वाहनचालकांवर कारवाई होत असताना शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.कारवाई केवळ एक दिवसापुरतीच का? खर्डा चौकात वाहनचालकांवर कारवाई केली जात असताना ही मोहीम केवळ एक दिवसापुरती मर्यादित राहणार की यापुढेही नियमितपणे सुरू राहणार, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करतानाच शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींवरही प्रभावीपणे नियंत्रण मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पोलीस कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला होण्याची घटना घडत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे केवळ वाहनचालकांवरील कारवाई न करता गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेणे, गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण होणार का?जामखेड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त, संशयित हालचालींवर लक्ष आणि गंभीर गुन्ह्यांतील आरोपींविरोधात प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यकच आहे; मात्र त्याचबरोबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीही ठोस पावले उचलली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे खर्डा चौकातील कारवाईनंतर पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार का आणि शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.
![]()
