कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्र 19 यांच्या वतीने व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत,सांगता कार्यक्रम पार पडला*

*काल कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्र 19 यांच्या वतीने व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत,सांगता कार्यक्रम पार पडला*

*मेरी माटी-मेरा देश!*
कार्यक्रम संपन्न झाला
त्यावेळी मा,दिलीप खेडेकर साहेब,मा,विकास पाटील साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्तव्यदक्ष जामखेड पो स्टे चे Pi मा महेश पाटील साहेब प्रमुख पाहुने व छत्रपती शिवाजी महाराज कृ उ बा स जामखेड चे सभापती मा,पै शरद (दादा) कार्ले,भाजपा उपाध्यक्ष /पिंपरखेडचे हॅट्रीक सरपंच मा,बापुराव ढवळे, पिपरखेडचे विध्यमान सरपंच मा राजेंद्र ओमासे,कुसडगावचे सरपंच मा पप्पु कात्रजकर,साहेबांचे स्वीय सहायक,युवा नेते मा,अजय सातव ,पिंपरखेड चे भाजपा नेते मा नजिरभाई व तालुक्यातील भाजपा नेते यांच्या उपस्थितीत भालाफेक,गोळाफेक,100 मीटर रनिंग,खो खो,हॉलीबॉल,कबड्डी खेळ अशा अनेक स्पर्धांच आयोजन करण्यात आलं

यावेळी बोलताना सभापती शरद कार्ले म्हणाले की,*आमदार प्रा राम शिंदे साहेबांच्या अथक परीश्रमाला यश आलं आणि कुसडगावच्या ओसाड माळरानाला आलौकीक महत्व प्राप्त झालं!*
ज्याठीकाणी कुसळाशिवाय काहीच येत नव्हतं ते ठिकाण आज जामखेड तालुक्याच्या केंद्रबिंदु ठरलयं,
कारणही तसचं आहे,कुसडगावच्या शासकीय माळरानाचा सर्वसामान्यांच्या हितासाठी वापर व्हावा या उद्देशाने त्याठीकाणी पोलीस ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्याचा निर्णय आ,प्रा राम शिंदेसाहेबांनी  घेतला आणि युध्दपातळीवर पाठपुरावा सुरू केला पण कधी सत्तेत तर कधी विरोधात असल्यामुळे अनेकवेळा अडचणीही आल्या पण शेवटी त्यांच्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच करत असलेल्या प्रमाणिक प्रयत्नांना यश आल आणि कुसडगावच्या ओसाड माळरानावर पोलीस ट्रेनिंग सेंटरला उभा राहीलं.

2016/17 ला प्रक्रिया सुरू झाली आणि 2023 ला ट्रेनिंग सेंटर सुरू झालं थोडा वेळ लागला पण तरीही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे की शासकीय जमीन सर्वसामान्य आणि शासनाच्याचं उपयोगी आली,,
*ती जमीन स्थानिक लोकांना हाताशी धरून कवडीमोल भावात कुटुंबियांना,नातेवाईकांना कंपन्यांसाठीही देता आली असती पण तसा कधी प्रयत्नही झाला नाही म्हणुनचं आजं कुसडगाव हे नावं महाराष्ट्राच्या नकाशात स्पष्टपणे झळकत आहे-शरद कार्ले सभापती!*

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page