आरंभ फाउंडेशनचे समाज कार्य कौतुकास्पद – पोलीस निरीक्षक महेश पाटील

जामखेड प्रतिनिधी,

आपण समाजाचे देणं लागतो. समाजात घडणाऱ्या चांगल्या गोष्टीचे समर्थन करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरंभ फाउंडेशन ने घेतलेला गणेशोत्सवानिमित्ताने महाप्रसाद वाटप करून पुढाकार व करीत असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व आरंभ फाउंडेशनच्या वतीने कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार मित्र मंडळ व बाफना उद्योग समूहाचे आकाश बाफना यांच्या सहकार्यातून शहरातील लोकमान्य वाचनालय येथे गणेशोत्सवानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, यांच्या हस्ते नारळ फोडून महाप्रसादाचे नायब तहसीलदार मनोज भोसेकर,शिवसेना तालुकाप्रमुख प्रा कैलास माने, उद्योजक आकाश बाफना, सुंदरदास बिरंगळ,डॉ भास्करराव मोरे,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नयूमभाई सुभेदार,संतोष गव्हाळे,विशाल अब्दुले, विनायक राऊत गफ्फारभाई पठण,अन्सार पठाण,डॉ सुरेश काशीद,पै उल्हास माने,सतीश पवार,निलेश तवटे,विशाल लोळगे आदींसह आरंभ फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  1. यावेळी महाप्रसादाची सुरवात ब्राह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळाचे निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थीपासून करण्यात आली यावेळी जवळपास १ हजार नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आरंभ फाउंडेशनचे हे ३ रे वर्ष आहे फाउंडेशच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून समाज हिताचे कार्य केले जाते या उपक्रमाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *