*जामखेड शहरात पार पडली राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा. देशभरातून 1031 विद्यार्थ्यांचा सहभाग*
जामखेड प्रतिनिधी-
शहरात ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला देशभरातून 1031 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
जामखेड येथील साईबन मंगल कार्यालय या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना आश्चर्यचकीत केले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळभाऊ रकटाटे हे होते.
या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले स्वरांजली भवर, शौर्य शिंदे, श्रेयश खेडकर, शुभम सोनवणे, श्रावणी राख, आर्या गायकवाड, रुद्र सोले विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पुरुषोत्तम राक्षे, स्वरांजली भवर, देवराज नागरगोजे, आयुष अंधुरे, विराज कोथुळे, शौर्य शिंदे, संस्कृती अवसारे, सार्थक जायभाये, नम्रता डिडुळ, श्रेयश खेडकर, साईराज पवळ, श्रेयश थोरवे, अमृता डिडुळ, अर्णव आंधळे, ओंकार टकले, श्लोक शेळके, शुभम सोनवणे, गणेश धोंडे, तनुजा राख, श्रावणी राख, समृध्दी थोरवे, ईश्वरी घोडके, सर्वेश जमदाडे, सानिध्य ठाकरे, आर्या गायकवाड, रुद्र सोले या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देण्यात आले.
यावेळी अकॅडमीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अकॅडमीत विद्यार्थी घडविण्याचे कार्य करणाऱ्या भाग्यश्री ऊगले, प्रियंका भोरे, मिरा आंधळे, जयश्री वारे, प्रिती कचरे, प्रियंका गाडे, सोनाली भांडवलकर, नंदिनी आजबे, रेश्मा चव्हाण या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्डने त्याचप्रमाणे अर्चना मोरे, वंदना वांढेकर, स्नेहल सातपुते यांना स्टार टिचर तसेच अंजली ठोंबरे यांना टु स्टार टिचर व सारिका वारे यांना थ्री स्टार टिचर या ॲवाडे ने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री. रमेशभाऊ गुगळे (अध्यक्ष, एच. यु. गुगळे उद्योग समूह), श्री. धनंजय बोंदार्डे (मा. गटशिक्षणाधिकारी, पं. स. पाटोदा), श्री. बबनराव मोरे (शासकीय लेखापरीक्षक, वर्ग-2), श्री. शांतीलाल आजबे (सर्टिफाईड ऑडीटर), डॉ.श्री. सुनिल गाडे (मा. पंचायत समिती सदस्य, आष्टी), श्री. सुरेश मोहिते (केंद्रपमुख, नायगांव-राजुरी), श्री. संतोष बनकर (संस्थापक, बीएसबी स्कुल, आष्टी), डॉ.सौ. प्रियंका चौरे (संचालिका, चौरे बालरुग्णालय), श्रीमती. मीना राळेभात (मुख्याध्यापिका, लोकमान्य नविन मराठी शाळा), श्री. लक्ष्मण गर्जे (मुख्याध्यापक, जि.प.प्रा. शाळा पांगुळगव्हाण), प्रा. महादेव मोरे, श्री. शशि खटावकर (प्रभारी आगार व्यवस्थापक), ॲड. श्री. प्रमोद राऊत (अध्यक्ष, जामखेड तालुका बार असोशिएशन), श्री. पोपट अरुण (मॅनेजर, अंबाजोगाई पीपल्स सहकारी बँक), श्री. संदिपशेठ ठोंबरे (संचालक, ओम फार्मा जामखेड), ॲड.श्री. महेश वारे, ॲड.श्री. आजिनाथ जायभाय, श्री. संतोष आजबे, प्रा.श्री. संजय राख, श्री. नामदेव पाटील वाळके, श्री. वेभव कुलकर्णी, श्री. महादेव ढगे, श्री. अनिल लोखंडे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रविंद्र रकटाटे, संचालक जय शेळके व सर्व शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी आभार संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले.