कर्जतचे सहा विद्यार्थ्यांना अबॅकस स्पर्धेत पारितोषिक
प्रतिनिधी
इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये कर्जत शहरातील सहा विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला.
दादासाहेब शेळके व अर्चना शेळके संचलित इन्स्पायर अबॅकस आणि वैदिक मॅथ अकॅडमी, पुणे मार्फत या स्पर्धा अहमदनगर येथे 28 जुलै 2024 रोजी घेण्यात आल्या.
यामध्ये ऋषिकेश विजय धस देवांग देशमुख, गौरवी हिंमत निंबाळकर, त्रिशा अविनाश बांगर, अर्णव प्रवीण भैलुमे, दिव्या देशमुख आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे
या विद्यार्थ्यांचा अहमदनगर शहराचे आमदार संग्राम भैय्या जगताप, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानेश्वर पांडुळे, डाक अधिकारी अमित देशमुख, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक विक्रम अडसूळ, टपाल संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष यादव, वन अधिकारी सचिन कंद आदी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
हे सहाही विद्यार्थी गदादे नगर कर्जत येथील देशमुख अबॅकस क्लासेस चे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना कीर्ती देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
याशिवाय भूषण मराळ, अर्णव फरांडे,विराज गणेश जगदाळे, भूषण चारणे, तनुजा संतोष राऊत, अथर्व प्रवीण भैलुमे आदी विद्यार्थ्यांनी देखील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.