साकत घाटामध्ये मका ट्रक पलटी होऊन एक जणांचा मृत्यू तर ड्रायव्हर बचावला
जामखेड प्रतिनिधी,
साकत घाटामध्ये मका ट्रक पलटी होऊन एक जणांचा मृत्यू तर ड्रायव्हर बचावला
घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळाल्याबरोबर कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन सोबत दीपक भोरे, विशाल ढवळे समवेत घटनास्थळी दाखल झाले तेथील हरिभाऊ मुरूमकर , नय्युम पठाण पाटोदा,काका मुरूमकर, बाबू सुपेकर विशाल जोगदंड ,अविनाश कदम, महेश मोळकर उपस्थित असणाऱ्या प्रवाशांनी मदत केली घटनेची माहिती अशी की रविवार दिनांक १८/५/२०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता एम एच १०डी टी ६५२१ दहा टायर ट्रक मका घेऊन चिखली येथून बारामती ला जात असताना जामखेड जवळील साकत घाटामध्ये पलटी होण्याचा अंदाज दिसल्या बरोबर किन्नर ने उडी घेतली आणि तो गाडीच्या खाली दबला गेला बराच वेळ सापडला नाही.
तसेच ड्रायव्हर केवळ शांतीलाल चव्हाण हा बाल बाल बसवला आहे मकाचे नुकसान झाले असून गाडीचे पण बरेच नुकसान झाले आहे.
उपस्थितांनी सापडण्याचे प्रयत्न केले आसता तो सापडल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोज शिंदे यांनी तपासणी करून मृत घोषित केले.
सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली पाटील यांनी ताबडतोब आपल्या पोलीस स्टेशनचे सरोदे पोलीस आणि इतर कर्मचारी पाठवून पुढील तपास चालू आहे.