जामखेड प्रतिनिधी,
संभाजीनगर, धाराशिवनंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.


आहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी दिसली नसती, आहिल्यादेवी यांनी कधीही भेदभाव केला नाही असं सांगत अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.