जामखेड प्रतिनिधी

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 जागा मिळाल्या आहेत. सोळा मे रोजी सभापती निवड तारीख निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी दिवशीच दोन्ही गटाचे सदस्य सहलीसाठी रवाना झालेले आहेत. सभापती व उपसभापती हे चिठ्ठीद्वारे होणार हे जवळपास निश्चित आहे. यात भाजपतर्फे दोन युवा नेते इच्छुक आहेत. यात सभापती पदासाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले
उपसभापती पदासाठी नदकुमार गोरे या युवकांना संधी मिळावी अशी इच्छा ग्रामपंचायत सदस्य यांची आहे

याचबरोबर सभापती पदासाठी इच्छुक असलेले भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले हे ग्रामपंचायत मतदारसंघातून विक्रमी मतदानाने निवडून आलेले आहेत. तेही पाच वर्षे पंचायत समितीचे सदस्य होते तसेच सध्या भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आहेत. आपल्या कामाच्या बळावर एक शांत संयमी युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते.

उपसभापती पदासाठी इच्छुक असलेले ग्रामपंचायत मतदारसंघातून विक्रमी मतदानाने निवडून आलेले आहेत. आपटीचे दोनदा बिनविरोध सरपंच असलेले व प्रा.आ.राम शिंदे यांचे खांदे समर्थक नंदू गोरे यांचं ही काम चांगलं आहे ग्रामपंचायत बरोबरच ग्रुप सोसायटी आपटी-पिंपळगाव उंडा-वाघा सोसायटी त्यांच्याकडे ओढून आणली त्यामुळे त्यांचेही पक्षात चांगले वजन वाढलेले आहे

 

आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वाखाली सहकार व शेतकरी विकास पँनल मधुन सभापती पदासाठी सुधीर राळेभात ह्या एकाच नावाची चर्चा आहे तर उपसभापती पदासाठी कैलास वराट हे नाव आघाडीवर आहे.

आमदार प्रा. राम शिंदे व सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्या नेतृत्वाखाली स्वाभीमानी शेतकरी विकास पँनल मधुन सभापती पदासाठी सचिन घुमरे व शरद कार्ले यांच्या नावाची चर्चा आहे तर उपसभापती पदासाठी
नंदु गोरे,वैजनाथ पाटील व डॉ. गणेश जगताप, विष्णू भोंडवे, नंदु गोरे यांच्या नावाची चर्चा आहे.

तब्बल अडीच वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीनंतर जामखेड बाजार समितीची निवडणूक झाली यात
कर्जत पाठोपाठ जामखेड मधील मतदारांनी दोन्ही आमदारांच्या गटाला समसमान कौल देत संपूर्ण महाराष्ट्रात एक चमत्कार केला आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतीत आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या गटाला समसमान जागा म्हणजे 9 – 9 मिळाल्या आहेत. सोळा मे रोजी सभापती निवड तारीख निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी दिवशीच दोन्ही गटाचे सदस्य सहलीसाठी रवाना झालेले आहेत.

कोणत्याही गटाकडे स्पष्ट बहुमत नाही. धोका नको व कोणी फुटू नये म्हणून दोन्ही गटानी आपापले सदस्य सहलीसाठी घेऊन गेलेले आहेत. सध्या तरी चिठ्ठी द्वारेच सभापती व उपसभापती निवडी होतील अशी परिस्थिती आहे. पण वरील नावाची चर्चा सध्या तालुक्यात आहे.

असे असले तरी येत्या सोळा तारखेला कळेचल कोण सभापती व कोण उपसभापती, चिठ्ठी कोणाला साथ देणार हे कळेलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *