*कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड येथे पाडव्यानिमित्त नवीन कांदा खरेदी केंद्र सुरू*
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अलंकार ट्रेडर्स या नवीन कांदा खरेदी आडतीचे उद्घाटन करण्यात आले. जामखेड परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे उत्पन्न घेतले जाते व हा कांदा योग्य भाव मिळावा याकरिता नगर, सोलापूर तसेच कडा या शहरांमध्ये विक्रीसाठी जात असतो.
परंतु कांदा खरेदीसाठी बाहेरचे व्यापारी जामखेड मध्ये यावेत व येथील शेतकऱ्यांना विक्रमी भाव मिळावा याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक हे नियमित प्रयत्न करत असतात याच प्रयत्नाच्या माध्यमातून आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अलंकार ट्रेडर्स या नवीन कांदा खरेदी केंद्राचे उद्घाटन बाजार समिती आवारामध्ये सभापती पै.शरद कार्ले तसेच उपसभापती श्री.कैलास वराट, संचालक श्री.सचिन नाना घुमरे श्री.नंदू आबा गोरे श्री.विठ्ठल चव्हाण, सुधीर दादा राळेभात, डॉक्टर गणेश जगताप, बबनराव लोंढे, सुरेश पवार, गजानन शिंदे, सतीश शिंदे, राहुल बेदमुथा व सचिव वाहेद सय्यद, अलंकार ट्रेडर्स या नवीन दुकानाचे मालक बबलू शेठ तांबोळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नवीन दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.
सभापती शरद कार्ले यावेळी बोलताना म्हणाले या आडत दुकानामुळे नक्कीच कांदा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण नगर सोलापूर कडा येथे जाण्यासाठी लागणारी वाहतूक वेळ शेतकऱ्यांचा वाचणार आहे आणि बाहेरील व्यापारी आता कांदा खरेदीसाठी जामखेड या ठिकाणी येतील म्हणजे कांद्याला भाव पण रास्त मिळेल