बारामती ॲग्रो लि. जय श्रीराम शुगर हळगाव युनिट तीन तर्फे गाळप हंगामा सांगता समारंभ संपन्न….
रोहित पवार लढवय्ये आमदार तर विरोधी रडके आमदार – विजयसिंह गोलेकर
जामखेड प्रतिनिधी –
रोहित पवार हे लढवय्ये आमदार आहेत. पहिल्याच आमदारकीच्या टर्म मध्ये ईडी चौकशी लावलेले देशातील पहिले आमदार आहेत. तरीही ते जनतेसाठी लढत आहेत. विधानपरिषदेवर नियुक्ती झालेले दुसरे रडके आमदार आहेत. रोहित पवार हे विकास कामांनी ओळखले जातात. त्यांचा विकास देखवत नाहीत म्हणून विरोधी आमदार विकास कामांना स्थगिती लावण्यात वेळ घालवता आमदार रोहित पवार लढवय्ये तर त्यांना विरोध करणारे रडके आमदार आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी व्यक्त केले..
आज बारामती अँग्रो लि. जय श्रीराम शुगर हाळगाव गाळप सांगता समारंभ झालायावेळी बारामती अँग्रोचे व्हाइस चेअरमन गुळवे आबा, निंबे साहेब, प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, दत्तात्रय वारे, सुधीर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, विठ्ठल चव्हाण, सुरेश भोसले, दिपक पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, जगदाळे,
बाबासाहेब उगले, युवराज उगले, विश्वनाथ राऊत, सुनील उबाळे, ढवळे, निलेश पवार, नारायण जायभाय, संतोष निगुडे, गजानन शिंदे, सुरेश पवार, नरेंद्र जाधव, मदन लेकुरवाळे, कुलकर्णी,परकड, यांच्या सह अनेक मान्यवर व ऊस उत्पादक शेतकरी हजर होते.यावेळी बोलताना विजयसिंह गोलेकर म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी कारखाना घेतला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिला नाही. तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार ही मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.
यावेळी बोलताना बारामती अँग्रोचे व्हाइस चेअरमन गुळवे आबा म्हणाले की, चालू गळित हंगामात जय श्रीराम हळगाव कारखान्याने 3.52 हजार मेट्रिक टन गाळप केले आहे. तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक ठेवला नाही. पुढील वर्षी जास्त गाळप करणार आहोत या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना आहे. सर्वात जास्त ऊस खर्डा गटातून आणला. ऊसाचे अँव्हरेज वाढविण्यासाठी ड्रिप करणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय वारे म्हणाले की हा कारखाना काटा मारणाऱ्या तानाजी सावंत टोळीकडे जाऊ दिला नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना ताब्यात घेतला यामुळे शेतकऱ्यांचा खुपच फायदा झाला आहे. आमदार रोहित पवार यांच्या वर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. अनेक कामे उल्लेखनीय आहे.सध्या मतदारसंघात पाणीटंचाई मुळे आमदार रोहित पवार यांनी मोफत पाण्याचे टँकर सुरू केले होते पण प्रशासनाने ते बंद केले आहेत तेव्हा टँकर बंद करणारांना चप्पलानी मारा असे सांगितले श्रीराम कारखाना कामधेनू आहे. सध्या 2900 भाव दिला आहे तरी यावर शेंडी लावावी असे सांगितले.
यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात म्हणाले की,रोहित पवार यांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो शेतकऱ्यांना वाली मिळाला, अँव्हरेज वाढले पाहिजे या भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना झालेला आहे. तालुक्यात कोठेही ऊस शिल्लक नाही यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा.मधुकर राळेभात म्हणाले की, ऊस उत्पादन वाढविण्यासाठी पट्टा पद्धतीने ऊस लागवड करा ऊस उत्पादन वाढले पाहिजे रिकव्हरी नुसार भाव द्यावा घरचा कारखाना आहे. जामखेड तालुक्याचे उत्पादन वाढणार आहे.