Bharat Bright Brilliance Infotech जामखेडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी
Bharat Bright Brilliance Infotech व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर जामखेडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जामखेड महाविद्यालयात आयोजित या शिबिराला शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

नागरिकांमध्ये वाढत चाललेले हृदयरोग, हाडांचे आजार, सांधेदुखी, बालआरोग्याच्या समस्या या सर्व बाबींचे निदान व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांची विशेष उपस्थिती लाभली.
हाडांचे तज्ञ डॉ. अर्जुन शेळके
हृदयरोग तज्ञ डॉ. अक्षय कात्रजकर
बालरोग तज्ञ डॉ. विकास शिंदे

तिघा तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांच्या आजारांविषयी सविस्तर तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. हृदयाचे आजार, हाडे व सांधेदुखी, मुलांच्या वाढीतील समस्या तसेच इतर आरोग्य तक्रारींवर थेट तपासणी करून नागरिकांना मोफत उपचार सल्ला देण्यात आला.

शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी होत याचा लाभ घेतला. शहरातील अनेक कुटुंबांनी संपूर्ण कुटुंबाची तपासणी करून घेत, शिबिराला सकारात्मक प्रतिसाद दिला.

या प्रसंगी सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, संचालक राहुल बेदमुथा, युवा उद्योजक हवा सरनोबात, पांडुराजे भोसले, अभिलाष टेकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य जागृतीसाठी असे उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे. या शिबिरामुळे जामखेडमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page