जामखेड प्रतिनिधी,
भारतीय जैन संघटनेचे दोन दिवसीय प्रथम राज्यस्तरीय
सभा व प्रशिक्षण पुणे येथे होणार आहे.
२० व २१ मे 2023 दोन दिवसीय अधिवेशन
वर्धमान प्रतिष्ठान पुणे येथे आयोजित असून संघटनेचा विस्तार आणि मजबूतीकरण बरोबरच वार्षिक कार्यक्रम,वेळापत्रक व जबाबदारी निश्चिती व लक्ष्य निर्धारण करणे हा या सभेचा उद्देश आहे.
सभेला संघटनेचे संस्थापक शांतीलाल
मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड,महासचिव राजेंद्र फतावत मार्गदर्शन करतील.
राज्य प्रभारी व राष्ट्रीय सचिव पंकज चोपडा, राज्य सल्लागार व राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील संबोधित करतील.
२० मे रोजी सकाळी १० ते ६ सभा व नवीन राज्य कार्यकारिणी सदस्यांची शपथ ग्रहण, २१ मे रोजी ९ ते ४ प्रशिक्षण दिपक नहार, अंकलेश्वर हे देतील.
राज्य अध्यक्ष नंदकिशोर सांखला, राज्य
सचिव दिपक चोपड़ा व राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. चंद्रकांत डागा हेही उपस्थित राहणार आहेत
तेव्हा या सभेला राज्य कार्यकारिणी सदस्य, विभाग अध्यक्ष व सचिव, जिल्हा अध्यक्ष व
सचिव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
व माहीती भारतीय जैन संघटना अहमदनगर दक्षिण जिल्हाअध्यक्ष श्री .अमोल तातेड आणि सचिव प्रफुल सोळंकी यांनी दिली