भास्कर मोरेच्या निषेधार्थ उद्या जामखेड बंदची हाक
आवाज जामखेडचा:-
जामखेड तालुक्यातील रत्नापूर शिवारातील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक होत आहे या विरुद्ध कॉलेजचे शेकडो विद्यार्थीनी व विद्यार्थी गेले सात दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
परंतु अद्याप भास्कर मोरे यांना अटक झाली नाही सात दिवसांपासून भास्कर मोरे पोलिसांना गुंगारा देऊन फरार आहे.भास्कर मोरेला लवकर अटक करावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
या आंदोलनास पाठिंबा म्हणून उपोषणकर्ते सर्व विद्यार्थी मुले मुली व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडच्या वतीने उद्या जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे.
या आंदोलनात शिवप्रतिष्ठानाचे जामखेड तालुकाप्रमुख पांडुरंग भोसले व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत हे प्रत्यक्ष सहभागी झाले असून इतर अनेक पक्ष संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
तसेच अन्याय अत्याचाराचा लढा तीव्र करण्यासाठी समस्त भीमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने जामखेड बंद व उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
तरी सर्व व्यापारी नागरिक यांनी या बंद मध्ये सहभागी होऊन उस्फुर्तपने कडकडीत जामखेड बंद ठेऊन सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.