अखेर डॉ. भास्कर मोरे यास अटक, पोलिसांनी
भिगवन (इंदापूर) येथून ताब्यात घेतले आहे.
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थीनीचे विनयभंग प्रकरनी संस्थेचे
संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांना
पोलिसांनी भिगवन इंदापूर येथून
ताब्यात घेतले आहे. अशी माहिती स्थानिक
गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश
आहेर यांनी दिली आहे.
जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनचा
अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात दि.
८ मार्च रोजी मेडिकल कॉलेजच्या
विद्यार्थीनीनेच विनयभंगाचा गुन्हा दाखल
केला आहे. तसेच भास्कर मोरे हा मेडिकल
कॉलेजच्या सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थीनी व
विद्यार्थी यांच्यावर शारीरिक, मानसिक व
अर्थिक पिळवणूक करत असून आम्हाला
न्याय द्यावा यासाठी गेली नऊ अंदोलन सुरू
आहे.
या अंदोलनास आ. रोहीत पवार,आ.
राम शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत
खैरे, उपविभागीय पोलीस विवेकानंद वाखारे,
तसेच विविध विद्यापीठांच्या समिती यांनी
भेटी दिल्या. तसेच विविध पक्षसंघटनांनी या
अंदोलनास पाठींबा दिला आहे.
दरम्यान अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस
अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या
आदेशानुसार व नियोजनानुसार स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश
आहेर यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने डॉ.
भास्कर मोरे यास इंदापूर तालुक्यातील
भिगवन येथून अटक केली आहे. या
अटकेमुळे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या
अंदोलनास मोठे यश आले आहे.