चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेवीकेवर झालेल्या आत्याचाराबाबत जामखेड येथील सर्व अंगणवाडी सेविका यांनी दिले तहसील कार्यालय व जामखेड पोलीस स्टेशनला दिले निवेदन….

त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी केली मागणी !

जामखेड प्रतिनिधी –

आज दिनांक 26 10 2024 रोजी जामखेड येथील सर्व अंगणवाडी सेविका यांनी दिले तहसील कार्यालय व जामखेड पोलीस स्टेशनला निवेदन यावेळी सुरेखा सदाफुले यांनी बोलताना सांगितले आहे की, आमची सहकारी अंगणवाडीचची सेविकेवर एका नराधमाने अमानुषपणे बलात्कार करून तिची हत्या केलेली आहे. तरीपण आमच्या सर्व अंगणवाडी सेविकेच्या मतीने त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी आमच्या सर्व अंगणवाडी सेविका तर्फे विनंती आहे.

कारण आज आमच्या अंगणवाडी सेवकांना आधार नाही. कारण ही प्रत्येक वाडी वस्तीवर आमच्या अंगणवाडी सेविका काम करत आहे तिला संरक्षणाची गरज आहे तसेच आमचे शासनाला विनंती आहे की, आमची जी वेळ वाढवलेली आहे त्या वेळेमध्ये शासनाने अध्यक्ष द्यावा आणि आमच्या अंगणवाडी सेविकेला त्वरित न्याय मिळावा कारण प्रत्येक सेविकावर अशी वेळ येऊ नये म्हणून आमच्या सर्व अंगणवाडी सेविका तर्फे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत याचा
जामखेड पोलीस स्टेशननी स्वीकार करावा तसेच
वाडी वस्तीवर सर्व अंगणवाडी आहेत आणि लांब आहे.

त्यामुळे आम्हाला संरक्षण देण्यात यावे यावेळी बोलताना म्हणाल्या तसेच चिचोंडी पाटील ता.जि. अहिल्यानगर येथील मिनी अंगणवाडी पेचील अंगणवाडी सेवीकेवर झालेला अत्याचार व तिच्या हात्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजेव सदर न्यायालयीन प्रक्रिया ही फासाट्रॅक कोर्टात झाली पाहिजे. जेणे करून आशा नराधमाना चाप बसेल तसेच गावापासून दूर असणाऱ्या अंगणवाड्या सी.सी.टी. व्ही व धोक्याचे आलाराम बसवून व सदर अंगणवाड्यांना एक मदतनीस असे काळाची गरज आहे.तसेच सदर अंगणवाडी सेबीकांना संरक्षण पुरवणे गरजेचे आहे.

अंगणवाडी ही शक्यतो वाडी वस्ती किंवा प्राथमिक शाळेलाच जोडून असावी.आत्याचार झालेल्या अंगणवाडी सेवीकेला न्याय मिळण्यासाठी त्या नराधमाला त्वरीत फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जामखेड येथील सर्व अंगणवाडी सेविकेने केली आहे यावेळी मोठय़ा संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *