खर्डा सीताराम गड व धाकटी पंढरी धनेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल नामाची शाळा भरली, प्रा.सचिन सर गायवळ यांच्या मोफत बससेवेला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद..
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील श्री क्षेत्र सिताराम गडावर देवशयनी आषाढी यात्रा निमित्ताने खर्डा येथील श्री क्षेत्र सिताराम गडावर व धाकटी पंढरी धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने व महिला तसेच लहानग्या मुली व मुलांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे या दोन्ही मंदिरावर विठ्ठल नामाची शाळा भरल्याचे चित्र दिसून आले होते.
त्याचबरोबर समाजसेवक प्रा.सचिन सर गायवळ यांनी खर्डा ते धनेगाव व नान्नज ते धनेगाव येथील धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी सहा लक्झरी मोफत बस सेवेचा तीन वर्षापासून लाभ देण्यात येत आहे. या मोफत बस सेवेचा शुभारंभ प्रा.सचिन सर गायवळ व खर्डाच्या सरपंच संजीवनीताई पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावर्षी प्रचंड संख्येने या मोफत बससेवेचा भावीक भक्तांनी आनंद घेऊन ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी व लहान मुलांचा प्रवास सुखकर केल्याबद्दल प्रा. गायवळ यांचे आभार जनसमान्यातून व्यक्त केले जात होते.
त्याचबरोबर अँड.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली खर्डा ते धनेगाव संविधान समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, या वर्षी संविधान समता दिंडीच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांनी प्रतिसाद देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेल्या आधिकर समाजातील तळागाळात पोहोचविण्याचे काम या समता वारकरी दिंडीच्या माध्यमातून केले जात आहे. त्या मधून समाजामध्ये सामाजिक समतेचा वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न अँड.अरुण जाधव हे करीत असतात. या दिंडीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा सन्मान करून सर्वांना या दिंडीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे.
तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर आबा राळेभात यांचा दिंडी सोहळा जामखेड मार्गे धनेगाव येथे असंख्य भावीक भक्तांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे, त्या दिंडीला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
देवशयनी आषाढी एकादशीच्या यात्रेनिमित्त पंढरपूरला येथे जाण्याचा योग अनेक भाविक भक्तांना येत नाही,परंतु धनेगाव येथील धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जामखेड तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक भाविक भक्त हे हजारोंच्या संख्येने धनेगाव व खर्डा येथील सिताराम गडावर उपस्थित राहत असतात.
त्याचबरोबर खर्डा येथील सिताराम गडावर आषाढी एकादशीच्या निमित्ताने भव्य असे रक्तदान शिबिर बार्शी येथील भगवंत ब्लड बँकेच्या वतीने व भक्तगणांच्या आयोजनाने यशस्वी झाले. यावेळी असंख्य भावी भक्तांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून सहभाग नोंदवला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने खर्डा येथील श्री क्षेत्र सिताराम गड व धाकटी पंढरी धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळेच या दोन्ही ठिकाणी विठू नामाची शाळा भरली असल्याचे चित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिसून आले होते. सर्वत्र विठ्ठल नामाच्या गजराने भक्तिमय वातावरण पसरले होते.
खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.