कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात जामखेड तालुक्यात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत चालू !
जामखेड-
तालुक्यात दहावीच्या पाच केंद्रावर व बारावीच्या सहा परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा चालू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी दिली .
जामखेड तालुक्यातील ल. ना . होशिंग विदयालय , नागेश विद्यालय , नान्नज , खर्डा, पाडळी, खर्डा आदि. ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत. सदर परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले असून दोन भरारी पथके परीक्षा केंद्रावर भेटी देत आहेत.
जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष मा. पोलिस निरीक्षक पाटील साहेब यांनी चांगला पोलिस बंदोबस्त पुरविला आहे. सर्व केंद्रसंचालक व पर्यवेक्षक हे चांगल्या प्रकारे परीक्षेचे कामकाज पहात आहेत .
विद्यार्थी यांनी आनंदी व उत्साही वातावरणात परीक्षा द्यावी असे अवाहन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले आहे.
जामखेड तालुक्यात प्रथमच परीक्षा शांततेत सुरू असल्याबद्दल पालक व विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे.