एच. यु. गुगळे क्लॉथ मर्चंट मध्ये ट्रॅफिक जॅम ट्रॅफिक जॅम मान्सून सेलला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १५ जुलै ते १५
ऑगस्टपर्यंत राहणार सेल
जामखेड प्रतिनिधी,
गेल्या अनेक दशकांपासून जामखेडसह शेजारील
अनेक जिल्हे व तालुक्यातील ग्राहकांची पहिली
पसंती असलेल्या एच. यु. गुगळे क्लॉथ मर्चंटच्या
दोन्ही दालनामध्ये सुरू असलेल्या ट्रॅफिक जॅम
मान्सून सेलला ग्राहकांचा अभूतपूर्व असा प्रचंड
प्रतिसाद मिळत असून सर्वच स्तरातील
ग्राहकांनी कापड खरेदीसाठी उडी घेतली
असल्याचे चित्र दिसत आहे.
जामखेड शहरातील मध्यवर्ती असलेल्या एच. यु. गुगळे
क्लॉथ मर्चंट व लक्ष्मी चौकातील लक्ष्मीपार्क या
दोन्ही भव्य दालनामध्ये हा सेल सुरू राहणार
आहे.
स्थापनेपासूनच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या
एच. यु. गुगळे क्लॉथ मर्चंटमध्ये सन १९६८
पासूनच प्रत्येक वर्षी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या
दरम्यान सेलचे आयोजन केलेले असते. या
सेलला मिळणारा प्रतिसाद पाहता क्लॉथ
शॉपच्या वतीने प्रत्येक वर्षी अनेक डिझाईनचे
नवनविन फॅशनचे भरपूर कपडे उपलब्ध करून
देण्यात येतात. सेलच्या दरम्यान महिला, तरूण,
लहान मुले यांसह सर्व स्तरातील ग्राहकांची
कापड खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून आली.
यावर्षी हा सेल दि. १५ जुलै रोजी सुरू झाला
असून पहिल्यादिवसा पासूनच ग्राहकांचा
प्रतिसाद मिळत आहे. हा सेल १५ ऑगस्ट पर्यंत
सुरू राहणार असून ग्राहकांनी कापड खरेदीचा
आनंद लुटावा असे आव्हान करण्यात आले
आहे.