जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी 375 वा बीजोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज जयंती,सोहळा भक्ती आणि शक्तीचा

जामखेड प्रतिनिधी,

जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी 375 वा बीजोत्सव व श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती या निमित्ताने जामखेड येथे “सोहळा भक्ती आणि शक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या भव्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

जगद्गुरु तुकोबारा यांचा 375 वा बीजोत्सव सोहळा श्रीक्षेत्र देहू, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जामखेड येथे यानिमित्ताने मागील 38 वर्षाची अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याची परंपरा आहे. यावर्षी त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भागवत धर्माची उज्वल परंपरा व सकल संतांच्या चरित्र कथेची एक संगीतमय कलाकृती अर्थात ‘ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस’ हा भव्य कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांनी लिहिलेल्या या कलाकृतीचे गायन आदेश चव्हाण ऋतुजा पाठक करणार आहेत. तर या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून प्राचार्य श्रीकांत होशिंग करणार आहेत. त्याचबरोबर प्रणव देशपांडे सुजल चव्हाण प्रमोद पदमुले हे साथ संगत करणार आहेत.

सोमवारपासून या भव्य उत्सवाची सुरुवात होणार आहे. यामध्ये ज्ञानेश्वर महाराज पवने जामखेड,याचे सायंकाळी सात ते नऊ वा. किर्तने होईल मंगळवारी राम महाराज डोंगर जाटनांदूर, बुधवारी चेतन महाराज बोरसे मालेगावकर, गुरूवारी ज्ञानेश्वर महाराज नगरे सिताराम गड, खर्डा, शुक्रवारी विजय महाराज बागडे जामखेड, शनिवारी दत्ता महाराज हुके परांडा, याची किर्तने होतील. रविवारी गोविंद महाराज जाळदेवळकर यांचे बिजोत्सवाचे कीर्तन होईल व सायंकाळी नामदेव महाराज विधाते यांचे कीर्तन होईल.

सोमवार दिनांक १७ मार्च रोजी भागवताचार्य रोहिदास महाराज गर्जे शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होईल. यामध्ये पहिल्या दिवशी विवेकानंद महाराज मंजरतकर व अर्जुन महाराज रासकर यांचे चार ते पाच तीस या वेळेत प्रवचन होईल त्यानंतर 12 मार्चपासून रविवार पर्यंत दररोज याच वेळेत ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस हा संगीतमय कार्यक्रम होईल तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा परिसरातील भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *