जैन कॉन्फरन्स आत्मज्ञान समितीच्या राष्ट्रीय प्रचार प्रसार मंत्री पदी तेजस कोठारी यांची निवड
जामखेड प्रतिनिधी,
स्थानकवासी जैन समाजाची मातृ संस्था असलेल्या जैन कॉन्फरन्स दिल्ली च्या आत्मध्यान समितीच्या राष्ट्रीय प्रचार प्रसार मंत्री पदी जामखेड चे सुपुत्र तेजस संजय कोठारी जैन यांची नियुक्ती जाहीर.
समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मालेगाव येथील शशिकुमारजी (पिंटूभाऊ) कर्नावट जैन यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
तेजस कोठारी यांनी संस्थेमध्ये २०१३ पासून जामखेड तालुका युवक अध्यक्ष म्हणून कार्य सुरु केले होते तेव्हा पासून मी त्यांचे काम जवळून पहिले आहे. त्या नंतर तेजस कोठारी यांनी युवक शाखे मध्ये अनेक पदावर सक्षम पणे काम केले असल्याने त्यांची ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष कर्नावट यांनी केले.
या वेळी कर्णावट म्हणाले की, कोठारी यांचे काम मी खूप जवळून पहिले आहे कारण मी प्रदेश अध्यक्ष असताना कोठारी हे संस्थेत कार्यरत झाले, त्यांच्या कार्यक्षमा पदामुळे त्यांना सतत बढती मिळत गेली आणि आज ते संस्थेत सर्वात कमी वयात ह्या पदावर पोहोचले आहे.
कोठारी यांच्या नियुक्ती बद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी तेजस कोठारी म्हणाले, मला २०१३ साली तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य असलेले वैभव नहार यांनी शशिकुमार कर्नावट यांच्या नेतृत्वातील युवा शाखेत तालुका अध्यक्ष पदावर शिफारस केली, त्या नंतर श्री. कर्नावट यांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनाने काम करत राज्यात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आणि आज पण आत्मध्यान सारख्या अति महत्वाच्या समिती मध्ये राष्ट्रीय स्थरावर काम करण्याची संधी त्यांनीच दिल्याने केलेल्या कामाचे चीज झाले असे वाटत आहे. इतकेच नव्हे तर २०१५ साली माझे पिताश्री संजय कोठारी हे चांगल्या मताने राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून निवडून आले होते.इथून पुढे देखील श्री कर्नावट आणि वरिष्ठच्या मार्गदर्शनात संस्था घरो घरी पोहोचविण्यासाठी काम करू आणि वरिष्ठनी टाकलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरवू अशी ग्वाही देतो
संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी, अविनाश चोरडिया, सौ. रुचिरा सुराणा,प्रदेश अध्यक्ष मोहनलाल लोढा, समितीचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष वर्धमान शिंघवी, राष्ट्रीय ललित मोदी, सतीश लोढा, नंदकुमार भटेवरा,भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार सांखला, भारतीय जैन संघटना जिल्हा सचिव प्रफुल सोळंकी ,भारतीय जैन संघटना जिल्हा अध्यक्ष अमोल तातेड ,राहुल राखेचा, मनोज भटेवरा, हितेश बलदोटा, निखिल संचेती, रवी गुगळे, यतिश डुंगरवाल, महेंद्र सुन्देचा मुथा, पंचम झोन युवाध्यक्ष देवेंद्र पारख, आदेश खिवंसरा, पारस मुथ्था शिरूर,मनोज शेटीया, सतीश चोपडा, चंद्रकांत चोरडिया,आदि सह विविध स्थरातील मान्यवरांनी तेजस कोठारी यांचे अभिनंदन केले.