शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतमाल खरेदी विक्री केंद्रावर आणून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा : सभापती पै.शरद कार्ले

जामखेड बाजार समितीत ‘नाफेड’ तर्फे सोयाबीन खरेदी-विक्री केंद्र सुरू

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड येथिल छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समितीचे उपसभापती व संचालकांच्या उपस्थित व हस्ते ‘नाफेड’ तर्फे सोयाबीन खरेदी-विक्री केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. आज दि. २८ नोव्हेंबर रोजी सुरू केलेल्या या खरेदी केंद्रात पहिल्याच दिवशी तब्बल १०० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आले. खरेदी केंद्र सुरू झाल्याने जामखेड तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती सभापती पै. शरद कार्ले यांनी दिली.

जामखेड बाजार समीतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक सोयीसुविधा निर्माण करण्यात सभापती, उपसभापती व संचालक अग्रेसर असतात. त्याच भुमिकेतून जामखेड बाजार समीतीच्या आवारात ‘नाफेड’ मार्फत सोयाबीन हमीभाव योजना खरीप सन २०२४-२५ चे खरेदी-विक्री केंद्र आजपासून सुरू करण्यात आले. बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, संचालक नंदकुमार गोरे गौतम, गौतम उतेकर, डॉ. सिताराम ससाणे, विष्णु भोंडवे, सुधिर राळेभात, सचिन घुमरे, आंकुश ढवळे, गणेश जगताप, सतिष शिंदे, वैजिनाथ पाटील, सुरेश पवार, विठल चव्हाण, राहुल बेदमुथा, रविद्र हुलगुंडे, गजानन शिंदे, सचिव वाहेद सय्यद, सहसचिव ढगे आदि मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीन पोत्याचे व वजन काट्याचे पूजन करून या केंद्राचे उद्घाटन करून प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्यात आली.
‘नाफेड’ तर्फे प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये दराने ‘सोयाबीन हमीभाव योजना’ अंतर्गत खरेदी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी १०० क्विंटल सोयाबीन शेतमालाची केंद्रावर आवक झाली.

हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून त्यामधील आर्द्रतेचे प्रमाण हे १२ टक्क्यांहून कमी व एफ ए क्यू दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री करावी. त्यासाठी आपल्या सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, अशी सूचना ‘नाफेड’मार्फत करण्यात आल्याची माहिती तसेच शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतमाल खरेदी विक्री केंद्रावर आणून तसेच जास्तीत जास्त ऑनलाईन करून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *