जामखेडमध्ये चपलांचा हार घालून माजी मंत्री धनंजय मुंडे सह वाल्मीक कराड यांच्या पुतळ्याचे दहन
जामखेड मध्ये पाळण्यात आला कडकडीत बंद
जामखेड प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या निर्दयी कृत्याच्या निषेधार्थ जामखेड मध्ये आज बुधवार दि ५ मार्च रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी चपलांचा हार घालून माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या सह आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच संबंधित सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाल्या शिवाय हा लढा थांबणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया बोलताना आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आज सकाळी अकरा वाजता जामखेड शहरातील खर्डा चौक या ठिकाणी सकल मराठा समाजासह जामखेड मधिल समस्त ग्रामस्थ व विविध पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले होते. तसेच यानंतर शहरातुन तहसील कार्यालयात पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलन कर्त्यांनी संतोष देशमुख अमर रहे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आला यानंतर हा मोर्चा जामखेड तहसील कार्यालयावर आल्यावर धडकला.
यावेळी आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली याबाबत दोन दिवसांपूर्वीच त्यांचे मारहाणीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे ते फोटो पाहून अख्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज चा हा मोर्चा कुठल्या जाती विरोधात नाही तर हा आरोपींच्या प्रवृत्ती विरोधात आहे. देशमुख यांचा मृत्यू झाला व त्यानंतरही त्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. संतोष देशमुख हे जे लोक चुकीचे काम करतात त्यांच्या विरोधात कायम लढत असत आणि म्हणूनच त्यांनी विरोध केला म्हणून त्यांना आपला जीव गमावा लागला.
बदलापूर प्रमाणेच या आरोपींचा एन्काऊंटर झाला पाहिजे. या ठिकाणी देखील राजकीय वरदहस्त करणारा देखील सह आरोपी करण्यात यावे. तसेच आरोपींना तातडीने लवकरात लवकर सुनावणी होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.
केजचे तत्कालिन पी आय महाजन व पी एस आय पाटील यांनी कामात हलगर्जीपना केल्याने केल्याने संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला आहे. त्याच बरोबर पकडलेले सर्व आरोपी फरार असताना त्यांना कोणी कोणी मदत केली याचा तपास करण्यात आलेला नाही या सर्व गंभीर गोष्टी घडल्या असताना. आरोपींना आज रोजी जेल मध्ये पंचतारांकित सोई सुविधा पुरवल्या जात आहेत. तरी वरील सर्व घटनांचा पुन्हा तपास करून आकाच्या आकावर देखील मोक्का, खंडणी, खुनात सहभाग व आरोपींना संरक्षण दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांनाही अटक करण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली.
आंदोलना दरम्यान सभापती शरद कार्ले, मंगेश (दादा) आजबे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, दत्तात्रय वारे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले, सुर्यकांत मोरे, हवा (दादा) सरनोबत, प्रदिप टाफरे, विकास (तात्या) राळेभात, पवन राळेभात, प्रशांत राळेभात, राहुल उगले, संजय काशिद, संपत राळेभात, बापूसाहेब कार्ले, अवदुत पवार, डॉ.भरत देवकर, डॉ प्रशांत गायकवाड, प्रविण बोलभट, उमर कुरेशी, गणेश हगवणे, आण्णा ढवळे, तात्यासाहेब बांदल, प्रदिप बोलभट, ॲड हर्षल डोके, ॲड प्रमोद राऊत, डॉ कैलास हजारे, नय्युम शेख, गणेश काळे, पप्पू काशिद, प्रविण उगले, तात्यासाहेब जरे सह अनेक ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.