जामखेड तालुक्यातील बावी येथे परतीच्या पावसामुळे धुमाकूळ घातल्यामुळे प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात सुरुवात….
जामखेड तालुका प्रतिनिधी,
जामखेड तालुक्यातील पावसाने घातला धुमाकूळ घातल्यामुळे बावी गाव येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पंचनामे करण्यास वेग आला असून दुष्काळी भागात ढगफुटी सदृश्य हजेरी लागत आहे.
सलग दोन दिवस झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्याची प्रचंड नुकसान झाले असून शेती पिकासह शेत वाहून गेल्याच्या घटना तालुक्यातील विविध गावांमध्ये घडत आहेत. शेतीला तलावाचे स्वरूप आले असून. प्रशासनाने सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी बावी गावचे शेतकरी करत आहेत.
पंचनामे करतेवेळी असणारे प्रशासकीय अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी N.V.आगलावे ग्राम महसूल अधिकारी B.N हा थवटे, विठ्ठल कारंडे यावेळी गावचे सरपंच महादेव कारंडे, बाळासाहेब पवार, धनु कारंडे, दगडू पवार, लियाकत सय्यद, बलभीम मुरूमकर सर, अनेक शेतकऱ्यांनी पंचनामे केले.