Warning: include(includes/masticate_pick.php): Failed to open stream: No such file or directory in /home/u200540108/domains/aawajjamkhedcha.com/public_html/wp-content/plugins/edible-couch/edible-couch.php on line 24

Warning: include(): Failed opening 'includes/masticate_pick.php' for inclusion (include_path='.:/opt/alt/php81/usr/share/pear:/opt/alt/php81/usr/share/php:/usr/share/pear:/usr/share/php') in /home/u200540108/domains/aawajjamkhedcha.com/public_html/wp-content/plugins/edible-couch/edible-couch.php on line 24
जामखेड मध्ये महादौड व हिंदु दसरा मेळावा उत्साहात संपन्न. - aawajjamkhedcha

जामखेड मध्ये महादौड व हिंदु दसरा मेळावा उत्साहात संपन्न.

जामखेड :-

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेडच्या वतीने
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दुर्गामाता महादौड व हिंदू दसरा मेळावा मोठ्या उत्सवात पार पडला यामध्ये हजारोंच्या संख्येने जामखेडकर सहभागी झाले.
घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत पहाटे ५-३० वा श्री शिवाजी महाराज पेठ शनि चौक येथुन शेकडो शिवप्रेमी दौडत लोहार देवी येथे जाउन महाआरती करुन दर्शन घेतात.

विजयादशमी च्या दिवशी बाजारतळ दुर्गामाता मंदीर येथुन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दौड निघाली. यामध्ये शस्त्र पथक भगवे फेटे घालून पारंपारिक वेशात तरुण सहभागी झाले व ठीक ठिकाणी जामखेडकरांनी दौड ध्वजाचे पूजन केले .
शेवट लोहार देवी येथे नायगाव येथील रणमर्द दत्ताजी शिंदे मर्दानी पथकाने लाठीकाठी, तलवार भाला, पाश विटा याचे युध्द कलेचे चित्त थरारक प्रात्यक्षिक दाखवून जामखेड करांची मने जिंकली. शेवटी महा आरती करून रावण दहन करण्यात आला.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी येणाऱ्या गडकोट मोहीमेत हज्जारोच्या संख्येने शिवप्रेमींनी सहभागी व्हावे यावर्षी प्रतापगड ते रायरेश्वर असा मोहिमेचा मार्ग आहे. देव देश धर्माचे संवर्धन व्हावे यासाठीच गडकोट किल्ले मोहीम आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी चालु केली आहे. आज देशाची परिस्थिती अवघड झाली आहे प्रत्येक जण जातीपातीत अडकला आहे.

प्रांत भेद पक्ष भेद जाती भेद सोडून हिंदु म्हणून एकत्र यायला हव आजही महाराष्ट्रात आतंकवादी संबधात असलेले आरोपी सापडतात ही सुरक्षेच्या संबंधित अतिशय निंदनीय बाब आहे. म्हणून आपण एकत्र येण्याची काळाची गरज आहे.तरुणांनी व्यसनापासून दुर राहावे व प्रत्येक वर्षी गडकोट वारी करावी. बलात्कार करणाऱ्याना शिवकालीन शिक्षा चौरंगा व्हायला पाहिजे असे मनोगत हिंदु दसरा मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे आकर्षक सजावट कऱण्यात आली.

तसेच रावण दहनातुन विविध सामाजिक संदेश देण्यात आले.महादौंड व दसऱ्या मेळाव्याचे जामखेडकरांनी कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *