विशालगड घटनेचा जामखेड मुस्लिम बांधवाकडून निषेध…
कर्जत चे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील तसेच तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन…
घटनेची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची केली मागणी !
जामखेड प्रतिनिधी –
१४ जुलै २०२४ रोजी छ. शिवाजी महाराज यांची राजधानी असलेले विशालगड या गडासमोरील काही अतिक्रमण झालेले असल्याचा आरोप काही जणांनी केलेले होते.अंदोलन करताना घटनात्मक लोक व लोकशाही मार्गाने शांततामय रितीने अंदोलन केले जावे अशी रचना भारतीय राज्यघटने मध्ये तरतुद केलेली आहे. परंतु अंदोलन करण्या अगोदर त्याची प्रशासनास कल्पना देउन व जी काही तथाकथीत अतिक्रमने होते असे अंदोलन करत्यांचे म्हणणे होते गजापुर हे गाव आहे या गावाचा अंदोलाकाच्यां म्हणण्या नुसार विशालगडावरील तथाकथीत अतिक्रमणाचा काहीएक अर्था संबंध नसताना त्यांनी विशालगडावर जान्या ऐवजी/विशालगड उंचावर असल्यामुळे या उंचीचे मार्गाने गडाकडे प्रयान करण्या अगोदर विशालगडाच्या पायथ्या लगत असलेले गजापुर वर हल्लाबोल केला. गावातील रहीवाशी असलेले मुस्लिमांची घरे घरातील वस्तु गाडया तसेच धारमीक पुस्तक पवित्र कुरान या सर्वांची नासधूस केली घरांची तोड फोड केली याच्यावरच ते थांबले नाहीतर त्यांनी घरात असणारे मांनसे, स्त्रिया, लहाण मुले व जे जे समोर येथिल त्या संर्वाचर हल्ला चडविला त्यांना अमाणुश रित्या मारहाण केली.
या नंतर ते गजापुर येथे वरील प्रकार करूण विशालगडावर पोहचले व तेथे ही असल्याले दुकानांची तोडफोड केली गडावर असलेले पुरातन धार्मीक स्थळ / मशिद व दरगाह याची ही विटंबना केली मशिद तोडुन मशिदी मधील पवित्र कुरान जाळण्यात आले मशिदीत असलेले जयनमाज जाळण्यात आले मशिदीत असलेले मेमबर तोडण्यात आले.सर्व प्रकार चालु असताना प्रशासनाने मा. जिल्हाधिकारी व मा. जिल्हा पोलीस अधिक्षक कोल्हापुर यांनी जो बदोबस्त अंदोलनासाठी दिलेला होता तो अतिशय तुटपुंजा व थोडा होता.खाली गजापुर गावात घरांची मोडतोड व हल्ला केल्याची माहिती या तुटपुंजा बंदोबस्ता पैकी काही प्रशासकीय कर्मचा-यांना प्रशासनास तसेच मा. जिल्हाधिकारी यांना देउन ही त्यांनी पुरेसा व था अंदोलोकांना आवर घालण्यासरखा पुरेसे सक्षम अधिकारी व पुलिस यंत्रना पाठवले नाहीत त्यामुळे हलगर्जीपणा करण्यात आला आहे.
ही परिस्थिती जिल्हा प्रशासनाकडुन झालेली हायगाई ही अजानतेपणे झालेली नाही तर ती जानीवपुर्वक झाल्याची दिसुन येते दुस-या शब्दात या जिल्हा प्रशासकीय यंत्रनेवर कुटलातरी अनुचित दबाव असल्याचे उघड उघड दिसुन येते.नंतर गुन्हेदाखल केलेले असल्याची बातमी वर्तमान पत्रात आलेली आहे पंरतु कार्यवाई अदयाप कोणावरही केलेली नाही.आता नव्याने भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय नागरीक सुरक्षा कायदा १ जुलै २०२४ पासून अमलात आलेला असुन या कायद्यामध्ये मॉबलिचीग गुन्हा या विरुध्दात गुन्हा नोंदनेची व मोठे शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. आणि जिल्हा पोलीस अधिक्षक कोल्हापुर यांनी या मॉवलिंचीग कायदया अंतर्गत गुन्हे या अंदोलंका विरुध्दात नोंदवुन त्यांना आटक करूण पुढील प्रोसेजर करणे अवशक असताना ते करणेस चुकलेले आहे.या अंदोलकांनी मुस्लिम समाजाचे पवित्र मशिद, दरगाह तसेच पवीत्र कुरानाची जाळ पोळ केली म्हणुन समस्त मुस्लिम समाजाच्या धारमीक भावना दुखावले असुन त्यांअतर्गत ही संबंधीत अंदोलकांनवर गुन्हे दाखल होणे अवशक आहे.
नव्या कायद्यानुसार जातीगत करणे व दंगल करणे जातीमध्ये देश पसरवणे या साठी नव्याने देश द्रोहाचे कलम लावुन गुन्हा दाखल करणे जरूरीचे आहे.वरील सर्व परिस्थिती पहाता आम्ही जामखेड तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज या निवेदना द्वारे मागणी करत आहोत मुस्लिम समाजाच्या धार्मीक भावना दुखुन पवित्र ग्रंथ कुरान तसेच मशिद व दरगाह तोडफोड केली म्हणून त्या अदोलकाविरोध्दात गुन्हे दाखल व्हावे. कलमाअंतर्गतही तसेच फौदारी पात्र कट कारस्थान करूण सरळ जातीय द्वेशातुन देशद्रोही अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा
तसेच वकिल संघटनेचे अध्यक्ष शमा हाजी यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अतिक्रमण काढण्यायाच्या नावाखाली जी हमले झाले.
आपले जे दर्गा आहे, जयनमाजआहे, मस्जिद आहे, कुराण आहे, याची जी तोडफोड झाली आहे. जाळपोळ झाली आहे. यामुळे आमचे मन दुखवली गेली आहे. त्यामुळे आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनच्या ज्या भावना दुखवल्या गेल्या आहे. म्हणून आम्ही सर्व मुस्लीम बांधव यांचा निषेध करीत आहोत. हे जे झाले आहे ते चुकीच्या मार्गाने झाले आहे. अतिक्रमण काढण्याची जी यंत्रणा आहे ते त्याना माहिती नाही का?आपल्याला कायदा हातात घेऊन अतिक्रमण काढण्याचा अधिकार त्याना दिला कोणी दिला? तसेच आपल्या हाताने अतिक्रण काढण्याचा अधिकार जुन्या कायद्यात पण दिले नाही व नवीन कायदा पण दिले नाही.याउलट नवीन कायदे अतिशय कडक झालेले आहे.
त्यानी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना माहिती दिली पाहिजे होती पूर्ण पणे कायदे चे चिंधड्या उडविले गेले आहे.बऱ्याच मुस्लिम बांधवांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे या ठिकाणी कुठे तरी पाणी मुरले आहे.तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
यावेळी मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहरोद्दीन काझी, नाझीमभाई काझी, सय्यद हाजी मंजूर, अँड शमा हाझी कादर, सय्यद इस्माईल (ग्रा.पं. सदस्य), सय्यद मुक्तार (जनता टेलर), इमरान रफिक कुरेशी, आबेद खान साहब, परवेज खान (राजू भाई), सय्यद जावेद इब्राहिम (बारूद), शेरखान भाई, शकीलभाई काझी,नय्युम भाई सुभेदार (ता. अ. प्रहार,), शाकीर आयुब पठाण, तोफिक मुनवर पठाण, सय्यद सैफअली फायकअली, वसीम बशीर शेख आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.