जामखेड शहरातील अनाधिकृत डीजीटल बॅनरवर कारवाई, मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक चौधरी उतरले रस्त्यावर…
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड शहरातील लावण्यात आलेल्या अनाधिकृत डिजीटल बॅनरवर जामखेड नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली.यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केली आहे.
या कारवाईचे नागरीकांनी स्वागत केले आहे.यावेळी मुख्याधिकारी यांनी पत्रकारांशी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की,जामखेड शहरांमध्ये विनापरवाने व अनधिकृत बॅनर लावण्यात आले होते
त्या अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
बॅनर लावणाऱ्याना वारंवार सांगूनही कारवाई होत नव्हती परंतु विनापरवानगी असणारे सर्व बॅनर हे नगरपरिषद व पोलीस प्रशासन मार्फत कारवाई करण्यात आली आहे मुख्याधिकारी यांनी बॅनर लावणाऱ्यांना सर्वांना आवाहन केले आहे की, माननीय सर्वोच्च उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. आशा प्रकारचे कोणत्याही स्वरूपाचे विनापरवानाचे बॅनर लावण्यात येऊ नये जामखेड शहरात बॅनर मुळे विद्रूपीपणा भरपूर होत असल्याने आशा प्रकारेच जामखेड शहरात कारवाई सुरू राहणार आहे.
नगरपरिषद व पोलीस प्रशासन हे कारवाई सुरू ठेवणार आहे. तसेच नगरपरिषदेचे व पोलीस प्रशासनाची रिक्त परवानगी घेऊनच स्वतःचे बॅनर लावावे अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.
यावेळी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव मँडम ,कार्यालय अध्यक्ष संभाजी कोकाटे पाणी पुरवठा व आरोग्य विभाग, ज्ञानेश्वर मिसाळ, कवादे साहेब, निरीक्षक घोडेकर, अभियंता इंजिनिअर आमेर शेख, ढवळे साहेब, सुरज मोहिते, संतोष पवार, प्रमोद टेकाळे, विजय पवार, हितेश वीर, प्रणित सदाफुले, अतुल कोकाटे, राजेंद्र गायकवाड, किरण भोगे, तुषार केवडे, लक्ष्मण माने,गुड्डू शेख आदी नगरपरिषदेचे कर्मचारी व पोलीस प्रशासन स्टाप उपस्थित होते.