शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार यांचे जामखेड येथे शिवसेना कार्यालयास सदिच्छा भेट… तालुका अध्यक्ष प्रा. कैलास माने यांच्या वतीने एकनाथ शेलार यांचे जंगी स्वागत 

शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार यांचे जामखेड येथे शिवसेना कार्यालयास सदिच्छा भेट… तालुका अध्यक्ष प्रा. कैलास माने यांच्या वतीने एकनाथ शेलार यांचे जंगी स्वागत

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड येथील तालुका अध्यक्ष प्रा. कैलास माने यांच्या कार्यालयास शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार यांचे जामखेड येथे शिवसेना कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता यावेळी तालुका अध्यक्ष कैलास माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जामखेड शहराच्या नागेश्वराच्या पावन भूमीमध्ये जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच जामखेड तालुका शिवसेना कार्यालयाला या ठिकाणी त्यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार यांनी हि बोलताना सांगितले आहे की, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा आपण तयारी केलेली आहे चांगल्या प्रकारचा आपण वातावरण केलेले आहे

तसेच आपल्याला चांगल्या प्रकारे विधानसभेला लोकांनी मतदान केले आहे लाडक्या बहिणीचा फायदा हि आपल्यामुळेच झाला आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आहे.

यावेळी शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार, शिवसेना नेते सुनील पाटील ठाणे,शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने, शिवसेना शहरप्रमुख देविदास भादलकर, दलित आघाडी तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र, कपिल माने, अभिजीत माने, आरिफ शेख, प्रमोद गव्हाळे, बाबासाहेब कोल्हे, बाळासाहेब साळवे, रोहित राजगुरू, अजय माने, सतीश शिरगिरे, बाबासाहेब कांबळे, संयम हजारे, सोमनाथ पवार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles